अकोला : अकोल्यात आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर, एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सलग तिसऱ्या दिवशी रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
अकोल्यात आणखी सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, तर एका रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यात आज सकाळी प्राप्त ७३ अहवालांमध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात तीन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, आज पहाटे एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत रुग्ण हा 65 वर्षीय पुरुष असून शंकरनगर येथील रहिवासी आहे.
जिल्ह्यात आज सकाळी प्राप्त ७३ अहवालांमध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात तीन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. ते पातूर, मोठी उमरी, पारस, इकबाल नगर बुलडाणा, वाकेकर रुग्णालय जळगाव जामोद जि. बुलडाणा (हा रुग्ण ओझोन हॉस्पिटल येथून संदर्भित आहे), बार्शी टाकळी, बाळापूर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, आज पहाटे एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत रुग्ण हा 65 वर्षीय पुरुष असून शंकरनगर येथील रहिवासी आहे. हा रुग्ण 23 जून रोजी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याचा आज पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
*प्राप्त अहवाल - ७३
*पॉझिटिव्ह अहवाल - ७
*निगेटिव्ह - ६६
आता सद्यस्थिती
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल - १६१४
*मृत - ८४ (८३+१)
*डिस्चार्ज - १२००
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - ३३०