अकोला -प्रतिबंधित असलेल्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा मोठा अवैध साठा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने सिंधी कॅम्प येथील कच्ची खोली परिसरातून जप्त केला आहे. जवळपास 10 लाख 67 हजार 500 रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. यामध्ये जयप्रकाश कलाचंद मोटवाणी आणि बिहार राज्यातील गया येथील कमल शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'ऑक्सिटोसिन इंजेक्शन' पोलिसांनी केले जप्त अशी झाली कारवाई
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी सिंधी कॅम्प येथील कच्ची खोली परिसरात राहणारा जयप्रकाश मोटवाणी याच्याकडे छापा टाकला. या छाप्यात पथकाला दहा बॉक्स मिळून आले. या बॉक्समध्ये 2 हजार 135 इंजेक्शन आढळून आले आहे. या इंजेक्शनची किंमत 10 लाख 67 हजार 500 रुपये आहे. हे इंजेक्शन प्रतिबंधित असल्याने ते अवैधरित्या साठविणे, विक्री करणे, परवाना नसताना विकणे यावरून कारवाई करण्यात आली आहे. गाय आणि म्हशीला हे इंजेक्शन दिल्यास हे दोन्ही प्राणी क्षमतेपेक्षा जास्त दूध देतात. त्यामुळे याचा वापर दुग्धव्यवसाय करणारे मोठ्या प्रमाणात करतात. परंतु, या इंजेक्शनचा परिणाम गाय, म्हैस यांच्यासह दूध सेवन करणाऱ्यावरही होत असल्याने सरकारने या इंजेक्शनवर बंदी घातली आहे. तरीही या इंजेक्शनचा अवैधरित्या वापर होत असल्याचे कारवाईवरून समोर आले आहे. जयप्रकाश मोटवाणी हा सहावी शिकलेला आहे. त्याच्याकडे असे औषध वापरण्याचा परवाना असल्याची शक्यता नाही. तरीही असे औषध बेकायदेशीर तो घरात विना परवाना, साठवूण, विकत होता. त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 50 रुपयाला हे इंजेक्शन तो घायचा. दुग्ध व्यवसाय करणाऱ्यांना तो 500 रुपये दराने विकत होता. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याविरोधात खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-Mystery Girl.. घरात आली तेव्हा होती १८ वर्षांची, घराबाहेर पडली तेव्हा झाली २८ वर्षांची, वाचा रहस्यमयी कहाणी