अकोला - अखिल भारतीय मराठी साहित्य मंचतर्फे दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अकोल्यात आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन दोन आणि तीन जून रोजी मराठा मंगल कार्यालयात होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनचे अध्यक्ष प्रकाश पोहरे राहतील. तर संमेलनाचे उद्घाटन लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्षपदी दुबईतील मसालाकिंग डॉ. धनंजय दातार हे करणार आहेत, अशी माहिती आज आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली.
दुसऱ्या वऱ्हाडी साहित्य संमेलनाची अकोलेकरांसाठी मेजवानी - Sahitya Sammelan
यंदाचे दुसरे वऱ्हाडी साहित्य संमेलन अकोल्यात भरणार आहे. २ व ३ जून रोजी होणाऱ्या या संमेलनाची जोरदार तयारी सुरू असून भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी यावेळी अकोलेकरांना मिळणार आहे.
संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार आहे. या संमेलनातील विशेष आकर्षण हे मराठी चित्रपट व मालिकांमधील अभिनेते भारत गणेशपुरे राहणार आहे. त्यांची मुलाखत डॉ. धनंजय दातार घेतील. यासोबतच या संमेलनामध्ये कथाकथन, कविसंमेलन, वऱ्हाडी कॅटवॉक, वऱ्हाडी रॅप, जोगवा, वर्हाडातील ऐतिहासिक वस्तूंची चित्रप्रदर्शनी अशा भरगच्च कार्यक्रमांनी मेजवानी राहणार आहेत.
या संमेलनात पुस्तक प्रकाशन सोहळा साहित्य पुरस्कार वराड रत्न पुरस्कार असे कार्यक्रम होतील. या संमेलनाला शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, डॉ. रणजीत सपकाळ,. डॉ. श्रीकांत तिडके, ज्येष्ठ कादंबरीकार दिनकर दाभाडे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्य डॉ. मोना चिमोटे, ज्येष्ठ पत्रकार संदीप भारंबे यांच्यासह आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहे. या पत्रकार परिषदेला पुष्पराज गावंडे, शाम ठक, प्रा. महादेव लुले, निलेश कवडे, प्रा. सदाशिव शेळके, निलेश देवकर, प्रा. रावसाहेब काळे यांच्यासह आदी उपस्थित होते.