अकोला - विरोधात कोणीही असलं तरी प्रत्येकाला आपल्या विजयाचा आत्मविश्वास असतो. विजयासाठी त्यांनी आखलेली रणनीती हीच त्यांच्या विजयासाठी महत्त्वाची ठरते. गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार तसेच चार दशकांपासून या ठिकाणाहून उभे राहत असलेले आताच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनाही विजयाचा आत्मविश्वास आहे. मात्र, मतदार कुणाला पसंत करतात त्यावरच उमेदवारांचा विजय अवलंबून असतो, असे मत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय धोत्रे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
प्रतिस्पर्धी उमेदवार माझे मित्रचं, जनताचं ठरवेलं आपला खासदार कोण होईल - संजय धोत्रे - संजय धोत्रे
भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे हे चौथ्यांदा अकोल्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीत पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसचे दुसऱ्यांदा उभे राहणारे हिदायत पटेल या तिघांमध्ये लढत आहे.
भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार संजय धोत्रे हे चौथ्यांदा अकोल्यातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. या निवडणुकीत पारंपारिक प्रतिस्पर्धी म्हणून वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर तसेच काँग्रेसचे दुसऱ्यांदा उभे राहणारे हिदायत पटेल या तिघांमध्ये लढत आहे. या लढतीत सर्वच उमेदवार आपापल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु, मतदार सुज्ञ आहे. त्याला माहित आहे, कोणाला मतदान करावे आणि कोणाला नाही. त्यांच्या मतदानानंतरच विजयाचे शिखर चढले जाते, असे संजय धोत्रे म्हणाले.
प्रतिस्पर्धी म्हणून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार आम्ही लढत असलो तरी आमच्या लढण्यालाही एक चांगला दर्जा प्राप्त झालेला आहे. निवडणुकीत जरी आम्ही प्रतिस्पर्धी असलो तरीही प्रत्यक्षात मात्र आम्ही चांगले मित्र आहोत. सहकार क्षेत्राशी संबंधित असलेले हिदायत पटेल यांच्यासाठी कार्यकर्ता म्हणून मी काम केले आहे. परंतु, ही निवडणूक एक वैचारिक पातळीची असून ती ढासळणार नाही, याची खबरदारी आम्ही सर्वच उमेदवार घेत आहोत. मतविभाजनाचा फायदा या निवडणुकीत नेमका कोणाला होईल हे सांगणे जरी कठीण असले तरी मोठ्या प्रमाणात मतविभाजन होईल याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदार कोणाला विजयी करेल हे येणारा काळच ठरवेल, असे भाजपचे उमेदवार संजय धोत्रे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.