अकोला - कोरोना लसीकरणाचे पथक असल्याचा बनाव करत भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची घटना अकोट शहरातील बुधवार वेस येथे घडली आहे. या दरोडेखोरांनी घरातील तिघांना जबर मारहाण करुन तोडांत बोळे कोंबून दोरीने बांधून ठेवले होते. घरातील मौल्यवान वस्तू चोरी गेल्याचे माहिती आहे. जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. अमृतलाल सेजपाल यांच्याकडे ही घटना घडली आहे.
अकोटमध्ये लसीकरण पथक असल्याचा बनाव करत भरदिवसा दरोडा - लसीकरण पथक असल्याचा बनाव करत भरदिवसा दरोडा
अकोट शहरातील प्रचंड रहदारी असलेल्या बुधवार वेस परिसरात प्रसिद्ध व्यापारी अमृतलाल सेजपाल हे आपल्या कुंटबासह राहतात. त्यांच्या घरी काही महिला व पुरुष आले. त्यांनी दरवाजा वाजवून कोरोना लसीकरण चौकशी पथक असल्याचे सांगितले.
अकोट शहरातील प्रचंड रहदारी असलेल्या बुधवार वेस परिसरात प्रसिद्ध व्यापारी अमृतलाल सेजपाल हे आपल्या कुंटबासह राहतात. त्यांच्या घरी काही महिला व पुरुष आले. त्यांनी दरवाजा वाजवून कोरोना लसीकरण चौकशी पथक असल्याचे सांगितले. यावेळी बनावट पथकाने घरात कोणकोण आहे, अशी विचारणा केली. मात्र, घरातील सदस्यांना शंका आल्याने त्यांनी ओळखपत्र मागितले. मात्र, या दरोडेखोर टोळीतील एक महिला दरवाजा जोरात लोटत घरात शिरली. घरातील वयोवृद्ध अमृतलाल सेजपाल, त्यांची पत्नी इंदुबहन सेजपाल, नात देलिशा यांना मारहाण करत तोडांत बोळे कोबंत त्यांना बांधले. अमृतलाल सेजपाल यांना सशस्त्र मारहाण करत जखमी केले. त्यानंतर घरातील सामानाची नासधूस केली आहे.
दरम्यान, दुसरीकडे एका खोलीत बंद असलेल्या आबा-आजी व नातीने तोडांतील बोळ काढून खिडकीतून आरडाओरडा केली.
त्यानंतर आजुबाजूचे शेजारी धावत आले. तोपर्यत दरोडेखोरांनी बाहेरून घराचा दरवाजा बंद करुन पळ काढला होता. शेजारच्या लोकांनी दरवाजा उघडून या तिघांची सुटका केली. दरोडेखोरांनी एक मोबाइल लंपास केला असून आणखी घरातील किती रुपयांचा ऐवज लंपास केला याबाबतची चौकशी सुरु आहे. दरम्यान, घटनेनंतर अकोट शहर, ग्रामीण पोलीस दाखल झाले. तर दुसरीकडे अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले व श्वान पथक, ठसे तज्ञ पथक दाखल झाले आहे.