अकोला - मध्यरात्री गॅस कटरने एटीएम फोडून ( Robbers Used Gas Cutter To Break ATM ) साडेसोळा लाखाची रोकड लंपास ( 16 lakh Stolen From Akola ) केल्याने खळबळ उडाली. ही घटना केशव नगर स्थित रिंग रोड मुख्य रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत ( State Bank Of India Akola ) घडली. घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत असून अद्याप पोलिसांना चोरट्यांचा सुगावा लागलेला नाही.
शहरात काही दिवसापासून चोरीचे सत्रशहरात गत काही दिवसापासून चोरीचे सत्र सुरु असून सर्वात जास्त चोरीचे प्रमाण खदान परिसरात घडत आहेत. घरफोडी, दुचाकी चोरी, मोबाईल चोरी ही तर नित्याची बाब बनली आहे. आता तर चक्क चोरट्यांनी एटीएमवर लक्ष केंद्रित केले आहे. थंडीची चाहूल त्यात पोलीस भरती असल्याने पोलीस कामात व्यस्त आहेत. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारस रिंग रोडवरील एसबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडल्याची घटना समोर आली. गॅसकटरने हे एटीएम फोडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. एटीएममधून 16 लाख 54 हजारची रक्कमेवर चोरट्यांनी हात साफ केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गुन्हे शाखा, खदान पोलिसांचा ताफा ( Khadan Police Station Akola ) घटनास्थळी दाखल झाला. जवळपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे.