अकोला- शहरातील किल्ला चौक ते बायपास या राज्य महामार्गावरील डांबरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याचे वृत्त ईटीव्ही भारतने प्रकाशित केले होते. यानंतर या बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामाची चौकशी करू असे सांगितले. तसेच रस्ता चांगला करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग, ठेकेदाराला रस्ता दुरुस्तीचे आदेश - ठेकेदार
ईटीव्ही भारतने अकोला शहरातील किल्ला चौक ते बायपास या राज्य महामार्गावरील डांबरीकरणाचे काम निकृष्ट होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल बांधकाम विभागाने घेऊन तो रस्ता चांगला करण्याचे आदेश संबंधित ठेकेदारला दिले आहेत.
ठेकेदाराच्या या मनमानी कारभाराविरोधात ईटीव्ही भारतने ९ फेब्रुवारीला वृत्त प्रकाशित केले. या बातमीची दखल बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता धिवरे यांनी घेतली. त्यांनी तातडीने संबंधित कंत्राटदाराची कानउघडणी करत रस्त्याचा दर्जा चांगला ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार नागरिकांच्या तक्रारीनुसार कंत्राटदाराने काम करत या तक्रारी दूर केल्या. आता हा रस्ता योग्य पद्धतीने पूर्ण झाला आहे. हे काम चांगल्या पद्धतीने झाल्याचे समाधान नागरिकांनी व्यक्त केले आहेत. दरम्यान, या संदर्भात कार्यकारी अभियंता धिवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.