अकोला - इंधन दरवाढीविरोधात आम आदमी पक्षाने शहरातील गांधी चौकातील पेट्रोल पंपाच्या समोर वाहनचालकांना चॉकलेट देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. केंद्रातील भाजप सरकार नव्हे तर चॉकलेट सरकार, अशी जोरदार घोषणाबाजी केली.
अकोल्यात इंधन दरवाढी विरोधात आंदोलन : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा आपच्या नेत्यांनी नोंदवला निषेध
इंधन दरवाढी विरोधात आम आदमी पक्षाने आज गांधी चौकातील पेट्रोल पंपाच्या समोर वाहनचालकांना चॉकलेट देऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. पेट्रोल पंप समोर आलेल्या वाहनचालकांना चॉकलेट देऊन केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात त्यांनी अनोखे आंदोलन केले.
इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. पेट्रोल पेक्षा डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडाला आहे. सरकारने इंधन वाढ कमी करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली. तसेच पेट्रोल पंपासमोर आलेल्या वाहनचालकांना चॉकलेट देऊन केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात त्यांनी अनोखे आंदोलन केले.
यावेळी शेख अन्सार, संदीप जोशी, गजानन गणवीर, अलीम मिर्झा, मुजीबुर रहेहमान, रविंद्र सावाळेकर, अरविंद कांबळे, अब्दुल रफीक, काजी लायक अली, ठाकुरदास चौधरी, दिलीप पाटील, प्रविण कावरे, आशुतोष शेंगोकार, दिनेश शिरसाट आदी उपस्थित होते.