महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोला : अतिवृष्टीमुळे ८६५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज; पंचनामे सुरू - akola latest news

अतिवृष्टीने अकोला जिल्ह्यातील १९५ गावांमधील ८६५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक माहिती जिल्हाप्रशासनाने दिली आहे.

akola heavy rain
akola heavy rain

By

Published : Sep 9, 2021, 3:33 PM IST

Updated : Sep 9, 2021, 3:53 PM IST

अकोला- गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने शेतीचे व नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीने १९५ गावांमधील ८६५७ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

प्रतिक्रिया

८६५७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान -

अकोला तालुक्यात २१ गावांमध्ये १३४७ हेक्टर क्षेत्रावर, मुर्तिजापूर तालुक्यात ३३ गावांमध्ये ४४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना, अकोट तालुक्यात १०२ गावांमध्ये २६४७ हेक्टर क्षेत्रावर, तेल्हारा तालुक्यात २४ गावांमध्ये ३४०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे असे एकूण १९५ गावांमध्ये ८६५७ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहेत. अध्याप पातूर व बार्शीटाकळी या तालुक्यात पिकांच्या नुकसानाबाबतची माहिती अद्याप उपलब्ध नाही. यामध्ये प्रामुख्याने सोयबीन, कापूस, मुग, उडीद, तूर या पिकांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा प्रशानसनातर्फे देण्या आली आहे. अद्याप पंचनामे करण्याचे काम सुरु आहे.

जिल्ह्यातील पूरस्थिती -

अकोला तालुक्यातील सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे. पूर्णा नदीस आलेल्या पुरामुळे ६०० लोकसंख्या असलेल्या दोनवाडा या गावाचा संपर्क तुटला होता. त्यामुळे गावातील ३० जणांना आपत्ती निवारण कृती दलाच्या जवानांनी सुरक्षित स्थळी हलविले आहे. या लोकांची जवळच म्हातोडी गावातील शाळेत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. याठिकाणी तहसिलदार बळवंत अखराव यांच्या नेतृत्त्वात नागपूर आपत्ती निवारण कृतीदलाचे उपनिरीक्षक केंद्रे व त्यांचे पथक तसेच तलाठी हरिहर निमकंडे, सुनील कल्ले आदी उपस्थित होते.

आपत्ती निवारण कृती दलाचे पथक नागपूर येथून आले असून त्यांच्या दोन तुकड्या करण्यात आल्या आहेत. त्यांच्यापैकी एक पथक हे दोनवाडा येथील बचाव कार्यासाठी कार्यरत आहे. दरम्यान, गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पुलावरून पाणी वाहन असून अकोला–अकोट रस्ता बंद आहे. तर अकोला-म्हैसांग-दर्यापूर हा मार्ग आज दुपारपासून सुरु झाला आहे.

बार्शीटाकळी तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला आहे. तथापि, कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. तालुक्यातील राजंदा मंडळात ८०.५ मि.मी पावसाची नोंद झाली आहे.

अकोट तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही. तालुक्यातील आसेगाव बाजार येथील ७२ घरे, रौदळा येथे ६० तर वरुर येथील एका घरात नाल्याचे पुराचे पाणी जाऊन नुकसान झाले आहे. पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. तेल्हारा तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आला असून नेर, सांगवी, पिवंदळ या गावांचा संपर्क तुटला आहे.

व्याळा मंडळात ८५ घरांचे नुकसान -

बाळापूर तालुक्यात बाळापूर मंडळात ७१.३ मिमी तर व्याळा मंडळात ७६ मिमी पावसाची नोंद झाली. शेगाव निंबा अकोट या मार्गावरील अंदुरा येथे पुलावरुन पूर्णा नदीचे पाणी वाहत असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. व्याळा मंडळात ८५ घरांचे नुकसान झाले असून पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु आहे. हाता येथेही काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे वृत्त आहे. पातुर तालुक्यातही सर्व नदी नाल्यांना पूर आलेला असून कोणत्याही गावाचा संपर्क तुटल्याचे वृत्त नाही. मुर्तिजापूर तालुक्यात सहा मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्यात ३३ घरांचे नुकसान झाले आहे. मात्र, कोणत्याही गावाचा संपर्क तुटलेला नाही, असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळ दोषमुक्त, एसीबी न्यायालयाची क्लीनचीट

Last Updated : Sep 9, 2021, 3:53 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details