अकोला -शहरातील शिवाणी टी पॉईंटजवळ स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत सुगंधित तंबाखू २० लाख ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
अकोला; २० लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त; दोन जणांना अटक
पोलिसांनी तंबाखूसह आयशर ट्रक असा २० लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालक मेहबूबमिया पिरसाहबमिया आणि क्लिनर रहमतमिया अहमदमिया मलिक यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
दोन जणांना अटक
एका आयशर ट्रकमधून बंदी असलेल्या सुंगधित तंबाखूची वाहतूक केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सागर हटवार यांना मिळाली . मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी शहरातील शिवाणी टी पाँईंटजवळ सापळा रचला आणि ट्रक अडवला. त्यानंतर ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये सुगंधित तंबाखूची २७ पोती आढळून आली. बाजारात याची किंमत ९ लाख ६८ हजार रुपये आहे. पोलिसांनी तंबाखूसह आयशर ट्रक असा २० लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चालक मेहबूबमिया पिरसाहबमिया आणि क्लिनर रहमतमिया अहमदमिया मलिक यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.