अकोला- पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा वाहून नेणारा ट्रक पकडला आहे. या प्रकरणी चालकाला अटक केली असून ट्रक व गुटखा असा एकूण २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बाळापूर महामार्ग पोलीस चौकीसमोर खामगाव ते अकोला हायवे रोडवर ही कारवाई करण्यात आली.
अकोल्यात विशेष पथकाने पकडला २५ लाखांचा प्रतिबंधीत गुटखा - प्रतिबंधीत गुटखा
ट्रकमधील माल आणि मालाची पावती यात तफावत आढळल्याने पोलिसांना संशय आला. त्यावर त्यांनी ट्रक तपासला असता हा प्रतिबंधीत गुटखा सापडला.
पांढऱ्या रंगाचा आयशर कंपणीचा मालवाहु (ट्रक क्र. एमएच-14-डीएम-4133) हा संशयितरित्या येताना दिसुन आला. वाहन थांबवुन चालकाची विचारपूर केली असता, विष्णुप्रसाद केशरसिंग मालवीय (३२, रा. बडीकोलाई हिम्मतपूर वार्ड नं १ जि. साजापूर मध्यप्रदेश) असे त्याने नाव सांगितले. त्यास वाहनामध्ये भरलेल्या लोडची पावती तपासली असता गाडीमध्ये सॅनेटरी वेअरची पावती क्रमांक ३७७, १२ जून. तर, पावतीवर ट्रक क्रमांक (एमपी-09-जीई-4377) असा लिहलेला होता.
ट्रकमधील माल हा पेरूनंदराई करीता भरलेला आहे. पावती वरील ट्रक क्रमांक चुकीचा असल्याने ट्रकची तपासणी केली. ट्रकमध्ये सॅनेटरी मालाच्या बॉक्सच्या वर खाकी, पांढऱ्या तसेच निळ्या रंगाची पोती आढळून आली. त्यातील मालाची पाहणी केली असता राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला गुटखा आढळला. सदर गुटखा आणि वाहन असा एकुण २५ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळूण आला आहे. हा मुद्देमाल इंदोरा येथून अकोला येथील दिलीप जेठाणी (रा. अकोला) याच्याकडे येत असल्याचे समजले आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलींदकुमार बहाकर यांनी केली. पुढील कारवाईकरीता मुद्देमाल हा सहायक आयुक्त साहेब, अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्याकडे देण्यात येत आहे.