अकाेला : दुचाकी चाेरी करणाऱ्या टाेळीचा स्थानिक गुन्हे शाखेने आज पर्दाफाश (Two wheeler scam busted) केला आहे. याप्रकरणी दाेघांना अटक (two thieves arrested) केली आहे. पोलिसांनी 20 दुचाकी जप्त (Police seized 20 bikes) केल्या असून, सहा लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दुचाकी चाेरी प्रकरणी अकाेला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत (Latest news from Akola). सुरेश रामभाऊ खरबडकर, सिद्धांत महेंद्र सुरडकर अशी दुचाकी चोरट्यांनी (Akola Crime) नावे आहेत.
बांधून ठेवलेली वाहनेही साखळी ताेडून चाेरीला :जिल्ह्यात अनेक दिवसांपासून दुचाकीरी चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. घर किंवा बाजारपेठेतून वाहन लंपास हाेत आहेत. अनेकदा तर घराबाहेर साखळदंडाने बांधून ठेवलेली वाहनेही साखळी ताेडून चाेरीला गेली आहेत. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने दाेन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चाैकशी केली. चाैकशीअंती पोलिसांना 20 दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पाेलिसांकडून देण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हेचे प्रमुख संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुकुंद देशमुख, पोलिस कर्मचारी दत्तात्रय ढोरे, श्रीकांत पातोंड, विशाल मोरे, रवींद्र पालीवाल, विजय कबले, इमरान अली, गोपाल ठोंबरे, गणेश सोनोने यांनी केली.