अकोला- अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जामून नाल्यामध्ये तसेच बंद पडलेल्या खाणीमध्ये असलेल्या अवैध गावठी दारूच्या एकूण सहा हातभट्ट्यांवर अकोट ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 55 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या हातभट्ट्यांवर पोलिसांची धाड - jivan sontakke
अकोला - अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अवैध दारू अड्ड्यावर धाड. ग्रामिण पोलिसांची कारवाई.
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात कष्टकरी आदिवासीबहुल समाज राहतो या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री केली जाते. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या बऱ्याच गावांमध्ये दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. तसेच काही तरुणसुद्धा व्यसनाच्या आहारी गेल्याने मारामारीचे प्रकार सुद्धा वाढले आहेत. तसेच रमजान महिना व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांनी आज सकाळी डिबी पथक व बीट कर्मचारी पथकाच्या मदतीने धाड टाकली. सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जामुन नाला व बंद पडलेल्या खाणीमध्ये इब्राहीम खान, निलेश रंगारी, मधुकर सूरगाये, मुकेश साल्पेकर, संजय महल्ले, आकाश सुरत्ने यांच्या अवैधरित्या चालू असलेल्या गावठी दारूच्या हातभट्ट्यांवर तसेच अंभोडा येथील कैलास पाटील यांचा देशी दारूच्या अड्ड्यावर धाडी टाकून 55 हजार 920 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. वरील सर्व आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाप्रमाणे अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण ७ गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
अकोट ग्रामीण ठाणेदार ज्ञानोबा फड गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण वाडेकर, विजय पंचबुद्धे, गजानन भगत, प्रवीण गवळी, अनिल शिरसाट, रामेश्वर भगत, अमोल बुंदे, विकास गोलाकार व चालक विलास अस्वार यांनी केली.