अकोला -संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल न करण्यासाठी २० हजारांची लाच मागणाऱ्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस जमादारावर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे ग्रामीण पोलीस ठाण्यामधील भ्रष्टाचार समोर आला असून पैशासाठी कुटुंबालाच बेड्या घालण्याचा प्रकार ठाण्यात होत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचा हवालदार हशमत खान दाऊद खान पठाण (बक्कल क्रमांक १०२४) असे आरोपीचे नाव आहे.
महिलेकडे २० हजाराची मागणी करणाऱ्या पोलिसाच्या एसीबीने आवळल्या मुसक्या
महिला तक्रारदार ही मजुरी करून आपल्या कुटुंब चालवते. हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या महिलेवर आणि कुटुंबातील इतर ३ व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याची धमकी देत पोलीस हवालदाराने महिलेकडे वीस हजारांची लाच मागितली.
महिला तक्रारदार ही मजुरी करून आपल्या कुटुंब चालवते. हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या महिलेवर आणि कुटुंबातील इतर ३ व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याची धमकी पठाणन याने त्या महिलेला दिली. ही कारवाई थांबविण्यासाठी लाचेची मागणी त्याने तक्रारदार महिलेकडे केली. तडजोडीअंती ही रक्कम वीस हजार ठरविण्यात आली.
तक्रारदार महिलेला रक्कम देणे मान्य नसल्याने तिने अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्याद दाखल केली. एसीबीने २८ मार्च रोजी याबाबत पडताळणी केली. त्यानंतर तब्बल एक महिन्याने एसीबीने अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात जमादार हशमत खान याच्यावर गुन्हा दाखल केला.