महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात बस लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ जणांना अटक - अटक

उमरेड ते अकोला बसवर बाभूळगावजवळ दगडफेक करून ती लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे.

एमआयडीसी अकोला पोलीस स्थानक

By

Published : Mar 9, 2019, 9:41 PM IST

अकोला- उमरेड ते अकोला बसवर बाभूळगावजवळ दगडफेक करून ती लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या ६ जणांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी त्यांना न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

उमरेड आगाराची (क्रमांक एमएच ४० वाय ५५४१) बस उमरेड ते अकोला या मार्गावरून जात होती. यात देवानंद गणेश गजभिये हे चालक होते. ही बस बाबूळगाव जवळ रात्री १ वाजता आली असता या बसवर काहीजणांनी दगडफेक करून ती लुटण्याचा प्रयत्न केला. या दगडफेकीत कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर चालक देवानंद गजभिये यांनी रात्री एमआयडीसी पोलीस स्थानकाला तक्रार दिली. यासंदर्भात पोलिसांनी गोपाळ गजानन काठोळे, शुभम पंजाबराव साबळे, अतुल रमेश गावंडे, रवी बाबुराव कळम, विनोद प्रकाश धनगर, अनिल बळीराम भाकरे यांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. दरम्यान, एमआयडीसी पोलीस स्थानकात दुपारी साडेतीन वाजता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

एमआयडीसी अकोला पोलीस स्थानक

या आरोपींनी बसवर दगड फेकून बसच्या काचा फोडल्या. तसेच शासकीय कामात नुकसान केल्यावरून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांना एमआयडीसी पोलीस रविवारी न्यायालयात हजर करणार आहेत. या घटनेचा तपास ठाणेदार किशोर शेळके करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details