अकोला- गोवंश येत असल्याची माहिती पोलिसांना देत असल्याच्या कारणावरून नायगाव परिसरात एकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तर आता यातील आणखी ३ आरोपीना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
गोवंश तस्करीची माहिती दिल्यामुळे झालेल्या हत्येप्रकरणी तिघांना अटक
गोवंश येत असल्याची माहिती पोलिसांना देत असल्याच्या कारणावरून नायगाव परिसरात एकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली होती. तर आता यातील आणखी ३ आरोपीना पोलिसांनी अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे.
नायगाव परिसरात राहणारे शेख सिकंदर शेख युनूस कुरेशी हे रात्री त्यांच्या घराजवळ उभे होते. तिथे रेहान कुरेशी, शेख सलीम उर्फ बल्ली हे दोघे तिथे आले. तू आमची मुखबिरी का करतोस असे म्हणून त्यांच्यावर दोघांनी चाकूने वार केले. त्यात ते गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर आरोपीच्या ४ साथीदारांनी शेख सिकंदर यांचा भाऊ शेख इर्शाद शेख युसुफ कुरेशी यांच्यावर व त्यांच्या वडिलांना मारहाण करून त्यांची गाडी फोडली. या प्रकरणातील चौघांपैकी तिघांना अकोट फाईल पोलिसांनी अटक केली. त्यामध्ये कम्मा कुरेशी, लल्लू उर्फ कलीम, कल्लू उर्फ सलीम यांना अटक केली आहे. चौथा आरोपी शेख हारून हा फरार आहे.