महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात देशी बनावटीचे पिस्तूल जप्त; एकास अटक - umesh husen arrested akola police

वाशिम बायपास येथे राहणारा उमेश हुसेन याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी शहानिशा करण्यासाठी हुसेन याच्या घरी छापा टाकला.

देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

By

Published : Oct 15, 2019, 3:54 PM IST

अकोला- वाशिम बायपास येथील एका तरुणाजवळ पिस्तूल पोलिसांना सापडले आहे. त्याच्याकडून हे देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले आहे. उमेर हुसैन साबिर हुसैन, असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

हेही वाचा-शरद पवारांच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओवर अजित पवारांनी दिले मजेशीर उत्तर

वाशिम बायपास येथे राहणारा उमेश हुसेन याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांनी शहानिशा करण्यासाठी हुसेन याच्या घरी छापा टाकला. पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. यात त्याच्या घरात पिस्तूल सापडले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्या जवळील पिस्तूल जप्त केले आहे. त्याच्या विरोधात जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details