महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात ४५ वर्षीय महिलेवर प्रियकराच्या भावासह मित्रांचा सामूहिक बलात्कार

एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय युवकासोबत ४५ वर्षीय महिलेचे सूत जुळल्यानंतर ते दोघेही एकत्र राहत होते. मुलाकडील नातेवाईकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे मुलाचा मोठा भाऊ त्या महिलेला 'तुला घरी घेऊन जातो, असे करू नका', असे सांगून तिला घरी नेण्यासाठी बुधवारी रात्री आला. यावेळी महिलेला घेवून जाणाऱ्या मुलाचे ३ मित्र हे त्यांच्यासोबत होते. दरम्यान, ते येवता मलकापूर रोडवर एका अंधाऱ्या ठिकाणी थांबले. त्यानंतर त्या महिलेला दुचाकीवरून खाली उतरून तिला अंधारात नेले आणि तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

एमआयडीसी पोलीस ठाणे

By

Published : May 2, 2019, 5:34 PM IST

अकोला- येवता ते मलकापूर रोडवर ४५ वर्षीय महिलेवर ४ ते ५ तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. इतर तिघांचा शोध सुरू आहे. दरम्यान, महिलेवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती देताना एमआयडीसी पोलिस ठाणेदार किशोर शेळके

एकाच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २७ वर्षीय युवकासोबत ४५ वर्षीय महिलेचे सूत जुळल्यानंतर ते दोघेही एकत्र राहत होते. मुलाकडील नातेवाईकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे मुलाचा मोठा भाऊ त्या महिलेला 'तुला घरी घेऊन जातो, असे करू नका', असे सांगून तिला घरी नेण्यासाठी बुधवारी रात्री आला. यावेळी महिलेला घेवून जाणाऱ्या मुलाचे ३ मित्र हे त्यांच्यासोबत होते. दरम्यान, ते येवता मलकापूर रोडवर एका अंधाऱ्या ठिकाणी थांबले. त्यानंतर त्या महिलेला दुचाकीवरून खाली उतरून तिला अंधारात नेले आणि तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

अत्याचारानंतर आरोपींनी महिलेला तिथेच सोडले. दरम्यान, महिलेला चक्कर आल्याने ती खाली पडली. त्यामुळे ती उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला त्रास कशामुळे होतो आहे, असे विचारल्यानंतर तिने आपबीती सांगितली. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याला माहिती दिल्यानंतर त्यांनी रुग्णालयात येऊन महिलेचे जबाब नोंदविले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून त्यातील आरोपींचा शोध घेतला.

याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोघांना ताब्यात घेण्यात आले असून इतर तिघांचा शोध सुरू असल्याची माहिती ठाणेदार किशोर शेळके यांनी दिली. अद्यापही आरोपींची नावे जाहीर करण्यात आली नसली तरी सर्व आरोपी शिवणी येथील रहिवासी असल्याचे ठाणेदार शेळके यांनी सांगितले.

राखणदारी करणाराही आरोपी

ज्यावेळी ४५ वर्षीय महिलेवर अत्याचार सुरू होता त्यावेळी एक आरोपी फक्त कोणी येत आहे का, याची राखणदारी करीत होता. दरम्यान, पोलिसांनी त्यालाही आरोपी केला आहे. आरोपींना मदत केल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details