महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यातील अटकाळी गाव विकासापासून दुर्लक्षित, पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना पायीच करावी लागते ये-जा - telhara

तेल्हारा तालुक्यातील अटकळी हे गाव अकोल्यापासून 40 किलोमीटर तर तेल्हारा शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. येथे ये-जा करण्यासाठी चांगला रस्ता नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ रस्त्याची मागणी करत असूनही रस्ता झालेला नाही.

अकोल्यातील अटकाळी गावच्या रस्त्याची झालेली दुर्रावस्था

By

Published : May 31, 2019, 7:08 PM IST

अकोला - तेल्हारा तालुक्यातील अटकळी हे गाव गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिले आहे. या गावात जाण्यासाठी कच्चा रस्ता असल्याने, तेथे एसटी महामंडळाची बस तर सोडाच खासगी वाहनेही येत नाहीत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पायीच ये-जा करावी लागत आहे.

तेल्हारा तालुक्यातील अटकळी हे गाव अकोल्यापासून 40 किलोमीटर तर तेल्हारा शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. येथे ये-जा करण्यासाठी चांगला रस्ता नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ रस्त्याची मागणी करत असूनही रस्ता झालेला नाही. रस्त्यासाठी निवेदन देऊनही रस्ता होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

अकोल्यातील अटकाळी गावच्या रस्त्याची झालेली दुर्रावस्था

अटकळी गावात 1 ते 4 थी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना बाहेरगावी जावे लागते. मनब्दा, भांबेरी, पाथर्डी या आजूबाजूच्या गावापर्यंत त्यांना पायीच ये-जा करावी लागत आहे. रस्त्याअभावी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. गावात रुग्णालय नसल्याने आजारी ग्रामस्थांना उपचारासाठी पायीच दुसऱ्या गावी जावे लागत आहे. तसेच गर्भवती महिलांनाही गावातून रुग्णालयात नेण्याची व्यवस्था नाही.

गावामध्ये दवाखाना नाही, आठवडी बाजार नाही, बँक नाही, खाजगी वाहन नाही, कापड दुकान नाही, छोट्या मोठ्या वस्तू सुध्दा मिळत नसल्यामुळे गावातील नागरिकांना दुसऱ्या गावावर आवलंबून राहावे लागत आहे. २१ व्या शतकातील हे गाव प्रगतीपथावर तर नाहीच उलट मागासलेले झाले आहे. या मागासलेपणा विकास अकोल्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे करतील काय? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details