अकोला - मूर्तिजापूर तालुक्यातील बोरगाव खुर्द येथील 6 वर्षाच्या परीधी विनायक राऊत चिमुकलीने आगळावेगळा पराक्रम केला असून तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. तिने 360 अंशामध्ये 30 सेकंदात 18 गिरक्या घेऊन हा विक्रम केला आहे. तिच्या या यशामुळे अकोला जिल्ह्याचे नाव पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.
India Book of Record : परीधीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली नोंद - 360 अंशामध्ये 30 सेकंदात 18 गिरक्या
स्व.परमानंद मालाणी येथे पहिलीत शिकत असलेली परिधी विनायक राऊत हिने स्वकर्तृत्वाने 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये आपले नाव नोंद करण्याचा विक्रम केला आहे. तिने 360 अंशामध्ये 30 सेकंदात 18 गिरक्या घेऊन हा विक्रम केला आहे.
स्व.परमानंद मालाणी येथे पहिलीत शिकत असलेली परिधी विनायक राऊत हिने स्वकर्तृत्वाने 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये आपले नाव नोंद करण्याचा विक्रम केला आहे. एका सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याची ती मुलगी असून या स्पर्धेची माहिती यूट्यूब वरून तिच्या पालकांना मिळाली. परीधीने चिकाटी आणि जिद्दीने सराव करून त्याचा व्हिडिओ तयार केला. आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी जानेवारी महिन्यात पाठवला. परिधी या परीक्षेत यशस्वी ठरली व यश प्राप्त करून एक आदर्श लहान मुलांसमोर ठेवला.
३० सेकंदात घेतल्या १८ गिरक्या
तिने स्वतःभोवती ३६० अंश कोणता न थांबता ३० सेकंदात १८ गिरक्या घेत हा विक्रम साधला आहे. यामुळे तिच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. त्याबद्दल तिला इंडिया बुक रेकॉर्ड तर्फे मानचिन्ह, पारितोषिक व प्रमाणपत्र मिळाले. देशपातळीवर विक्रमासाठी कुठलेही विशेष प्रशिक्षण न घेता प्रचंड सराव करून ही कला परीधीने आत्मसात केले. घरी पाळण्याला दोरी बांधून विशिष्ट प्रकारे गिरकी घेण्याचा ती सातत्याने सराव करीत होती. खडतर परिश्रमातून तिने हे यश प्राप्त केले आहे. आई-वडिलांचे प्रोत्साहन व कुटुंबीयांनी दाखवलेल्या विश्वासाने हे यश गाठल्याचे तिने सांगितले. तिच्या या यशाबद्दल स्व. परमानंद मालानी शिक्षण केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती गिताबाई मालानी तसेच प्राचार्य व शिक्षकवृंदांनी कौतुक केले.