महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : जनजागृतीसाठी पेंटर रस्त्यावर लिहतो 'कोई, रोड पर, ना निकले,' तरीही. . . .

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारने संचारबंदी केली आहे. मात्र तरीही नागरिक रस्त्यावर निघत आहेत. त्यामुळे राहुल सासणे नावाच्या पेंटरने चोकाचौकात जनजागृती सुरू केली आहे.

By

Published : Mar 27, 2020, 12:27 PM IST

अकोला- कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाकडून होत असलेल्या उपाय योजनांना नागरिक मात्र जुमानत नसल्याची परिस्थिती आहे. तरीही राहुल ससाने नावाचा पेंटर आपल्या पद्धतीने नागरिकांना समजवण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. 'कोई रोड पर ना निकले', असे रस्त्यावर तो पांढऱ्या रंगाने मोठ्या अक्षरात लिहीत असून कोरोनाबाबत आपल्या पद्धतीने जनजागृतीचा प्रयत्न करत आहे.

शासनाकडून मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रचार व प्रसार केला जात आहे. या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आरोग्य विभाग, मनपा आणि पोलीस दलाचे कर्मचारी येऊन या विषाणूचा पायबंद कसा करावा याबाबत सांगत आहे. तरीही नागरिक संचारबंदीचे उल्लंघन करीत रस्त्यावर निघत आहेत. या प्रकारामुळे हा विषाणू मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांना न समजणार्‍या या बाबींमुळे प्रशासनही आता हतबल झाले आहे.

कोरोना या विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी राहुल ससाणे नावाचा पेंटर रस्त्यावर उतरला आहे. स्वतःची दुचाकी, पांढऱ्या रंगाचा डबा आणि एक ब्रश घेऊन तो चौकाचौकांमध्ये उभा जात आहे. ब्रश हातात घेऊन तो रस्त्यावर मोठ्या अक्षरांमध्ये 'कोई, रोड पर, ना निकले', असे लिहून नागरिकांना घरातच बसण्याचा संदेश देत आहे. त्याचे हे कार्य कौतुकास्पद असून मात्र नागरिकांकडून त्याच्या या कार्याला बेदखल करण्यासारखा प्रकार होत आहे. तरीही त्याने हिम्मत हारली नाही. तो हा संदेश चौकाचौकात लिहत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details