अकोला - पातूर ते अकोला रस्त्यावरील लाखनवाडा येथे चारचाकी आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळी मृत्यू झाला. प्रभू हिरासीया असे अपघातग्रस्त मृत व्यक्तीचे नाव आहे.
अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; लाखनवाडा रस्त्यावरील घटना - akola accident news
पातूर ते अकोला रस्त्यावरील लाखनवाडा येथे चारचाकी आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळी मृत्यू झाला. प्रभू हिरासीया असे अपघातग्रस्त मृत व्यक्तीचे नाव आहे.
पातूर ते अकोला रस्त्यावरील लाखनवाडा येथे चारचाकी आणि दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा घटनास्थळी मृत्यू झाला.
संबंधित चारचाकी गाडी पातूरच्या दिशेने जात होती. अकोल्यातून कापशीकडे जाताना अगरबत्ती विकणारा व्यवसायिक प्रभू हिरासीया यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर चारचाकी नजीकच्या बैलगाडीला धडकली. या घटनेची माहिती बार्शीटाकली पोलीस ठाण्याला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.