अकोला -अकोल्यात सोमवारी सायंकाळी आलेल्या तपासणी अहवालात नऊ जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. दिवसभरात 18 रुग्ण पॉझिटिव्ह निघाले असून 277 जणांचे अहवाल तपासण्यात आले आहेत. तर, उपचार घेताना एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
अकोल्यात सोमवारी कोरोनाचे आणखी नऊ रुग्ण सापडले; एका महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू - कोरोना रुग्णसंख्या अकोला
अकोल्यात सोमवारी संध्याकाळी आणखी ९ जणांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या नऊ रुग्णांमध्ये सात पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. तर, एका चाळीस वर्षीय महिलेचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या नऊ रुग्णांमध्ये सात पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. या रुग्णांपैकी दोन जण हे न्यू राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी आहेत. तर, अन्य रणपिसे नगर गोरक्षण रोड, पावसाळे ले आऊट कौलखेड रोड, सिंधी कॅम्प, शिवर, बाळापूर व पातुर येथील रहिवासी आहेत. दरम्यान, एका चाळीस वर्षीय महिलेचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला मोहम्मद अली रोड येथील रहिवासी आहे. ही महिला 19 मे रोजी उपचारार्थ रुग्णालयात दाखल झाली होती. 23 मे रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता आणि सोमवारी तिचा मृत्यू झाला आहे.
प्राप्त अहवाल - २७७
पॉझिटिव्ह - १८
निगेटिव्ह - २५९
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - ४१५
मृत्यू - २५ (२४+१),
डिस्चार्ज - २५१
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - १३९