अकोला- शहरात आज एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे, यासह रुग्णांची संख्या चार झाली आहे. सिंधी कॅम्प येथील 41 वर्षीय व्यक्ती हा कोरोना पॉझिटिव्ह निघाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन वार्डात उपचार सुरू आहे.
आज प्राप्त झालेल्या 12 अहवालापैकी 11 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यासोबतच बैदपुरा या परिसरातील पहिला कोरोना रुग्ण हा पाचव्या व सहाव्या तपासणी अहवालामध्ये निगेटीव्ह आला असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे देण्यात आली आहे.
अकोल्यात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला, शहरातील आकडा ४ वर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीन रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या तिघांचीही चौथी चाचणी ही पॉझिटिव्ह आली होती. दरम्यान, त्याच वेळी पातूर येथील सात कोरोनाबाधितांनी आजारावर मात केल्यानंतर त्यांना घरी सोडून देण्यात आले होते. त्यामुळे अकोल्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत होता. मात्र, आज आलेल्या अहवालातून एक रुग्ण हा पॉझिटिव्ह आढळलाा आहे. विशेष म्हणजे, हा व्यक्ती सिंधी कॅम्प या परिसरातील असून तो कोणाच्या संपर्कात आला आहे; याबाबत कुठलीही माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे या पॉझिटिव रुग्णांच्या इतर नातेवाईकांची तपासणी करण्यात येणार असून त्याच्याशी संपर्कात असलेल्यांचा शोध घेण्यात येत आहे.
अकोल्यात आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला, शहरातील आकडा ४ वर सिंधी कॅम्प परिसर प्रशासनाकडून प्रतिबंधित करण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान, बैदपुरा या परिसरातील पहिल्या रुग्णाची पाचवी व सहावी चाचणी निगेटिव्ह आली असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, ही बाब अकोलेकरांसाठी सुखद असली तरी वाढलेल्या एका रुग्णाने मात्र चिंता वाढवली आहे.