अकोला :रात्रीची बोचणारी थंडी, थंडीत शेकोटी करून लाईन केव्हा येते याची वाट पाहत बसणारे शेतकरी, शेतमजूर, अंधारात बॅटरीचा प्रकाश, त्यामध्ये शेतकरी जीवमुठीत घेऊन शेतातील हरभरा, गव्हाला पाणी देत असल्याचे चित्र जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये (Electricity problem face farmer) आहे. संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना महावितरणकडून रात्रीचा वीजपुरवठाकरण्यात येत असल्याने शेतकरी जीवमुठीत घेऊन शेतात रात्री दोन वाजता पिकांना पाणी देत असल्याचे वास्तव ईटीव्ही भारतने या रिपोर्टमधून समोर आणले आहे. अकोला तालुक्यातील 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या निपाना गावातील आहे. रात्रीचा दिवस करणाऱ्या या शेतकऱ्यांना कृत्रिम संकटाचा सामना करावा लागत आहे, हे यावरून सिद्ध होत आहे.
रात्रीचा वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी ठरतोय जीवघेणा प्रतिक्रिया देताना शेतकरी कृत्रिम संकटाचा सामना : खरिपातील असणारी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बीमधून दिलासा मिळण्याची आस होती. परंतु, महावितरणच्या विजेच्या पुरवठा संदर्भातील असलेले वेळापत्रक हे शेतकऱ्यांच्याच मानगटीवर बसत असल्याचे दिसते. काही भागांमध्ये दुपारी तर काही गावांमध्ये रात्री वीज पुरवठा करण्यात येत असल्याने शेतकरी रात्री शेतात पिकांना पाणी देत असल्याचे चित्र आहे. युवकांपासून तर वृद्धांपर्यंत शेतकरी महावितरणच्या अफलातून कारभारामुळे त्रस्त (Night power supply becoming dangerous) आहे.
पिकाचे मोठे नुकसान :यावर्षी पावसाने शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर कसेबसे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आणि पुन्हा एकदा जोमाने गहू, हरभऱ्याची उसनवारी कर्ज घेऊन पेरणी केली. परंतु, शेतकऱ्यांच्या समस्या काही सुटता सुटेना. अजूनही विजेचा तुटवडा हा शेतकऱ्यांच्याच नशिबी येत आहे. त्यामुळे शेतकरी जेव्हा विज पुरवठा होत असेल त्यावेळी शेतात पिकांना पाणी देण्यासाठी दिसत (Night power supply in Akola) आहे.
रात्रीचा पुरवठा :महावितरणच्या वीज पुरवठ्याच्या अवेळी असलेले वेळापत्रक शेतकऱ्यांची झोप उडवीत आहे. परिणामी शेतकरी कुठलाच पर्याय नसताना शेतातील पीक जगविण्यासाठी शेतात हिवाळ्याच्या कडक थंडीत थंड पाण्यात शरीर भिजवून पिकांना पाणी देत आहे. काही गावामध्ये सकाळी, काही गावांमध्ये दुपारी तर काही गावात रात्रीचा पुरवठा होत आहे. ही वीज आठ ते दहा तास देण्यात येत असली तरी पुरवठा होत असताना बऱ्याच ठिकाणी भारनियमन ही शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. परिणामी, रात्री शेतकऱ्यांना पुन्हा पुरवठा केव्हा सुरू होतो, याची वाट पाहत रात्र शेतातच काढावी लागत असल्याचे वास्तव आहे.
शेतकरी त्रस्त :रात्रीच्या वेळी शेतात पिकांना पाणी देताना वन्यप्राणी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती आहे. रात्रीची वीज न देता सकाळी किंवा दुपारी दिल्यास पिकांना व्यवस्थित पाणी दिल्या जाते. भितीपोटी शेतातील रात्रीची कामे होत नाही, पिकांनाही व्यवस्थित पाणी दिल्या जात नसल्याने काही भागातील पीक करपत आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी रामा गावंडे यांनी दिली. महावितरणच्या बेजबाबदार वेळापत्रकामुळे शेतकरी त्रस्त आहे. पिकांना पाणी देण्यासाठी मजूर ही येण्यास तयार नाही. रात्रीची मजुरी जास्त द्यावी लागते. काम कमी होते. त्यामुळे महावितरणने दुपारी वीज पुरवठा करावा, अशी मागणी युवा शेतकरी आशिष काळे यांनी (farmers in Akola) दिली.
वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हैराण :अति पावसामुळे खरीप पीक हातचे गेले. त्यात हवे तसे उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बीवर आशा होती. परंतु, आता नैसर्गिक नाही तर कृत्रिम संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. रात्रीचा दिवस करून शेतकरी शेतात राबत आहे. किमान रब्बीत तरी चांगले उत्पन्न होईल. परंतु, महावितरणच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यामुळे महावितरणने रात्रीच्या ऐवजी सकाळी व दुपारी वीज पुरवठा करावा, एवढीच मागणी शेतकरी महावितरण आणि शासनाकडे करीत (Night power supply) आहे.