अकोला -महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष भविष्यात सर्वच निवडणुका एकत्र लढतील, असे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी म्हटले होते. त्यावर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस आगामी सर्वच निवडणुका या स्वबळावर लढविणार आहे. कुठल्याही प्रकारची संघटन करणार नसल्याचे स्पष्ट केले असून त्यांनी शरद पवार यांना चांगलाच टोला मारला आहे.
शरद पवारांना पटोलेंचा टोला; काँग्रेस स्वबळावरच सर्व निवडणूक लढविणार पक्षाची भूमिका मी जाहीर करेन - नाना पटोले
स्वराज्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे ते म्हणाले, मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे पक्षाची भूमिका मी जाहीर करेन. दुसऱ्यांना तर जाहीर करता येणार नाही. त्यामुळे ते नेमके काय बोलले आणि त्यामागील त्यांची भूमिका काय हे माहीत नाही. काँग्रेसने स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
काँग्रेस स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढेल - नाना पटोले
पुढे ते म्हणाले, काँग्रेस ही स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा या निवडणुका स्वबळावर लढेल. तसेच सध्या कोरोनाचा काळ आहे. त्यामुळे आता निवडणुकीचा विषय होवू शकत नाही, असे मला वाटते, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. या पत्रकार परिषदेत महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.