अकोला - बाळापूर मतदारसंघात 20 ते 25 टक्के मुस्लीम समाज असूनही आजपर्यंत केवळ काँग्रेस आणि इतर पक्षांनी मुस्लिमांना वापरून घेतले आहे. आता मात्र मुस्लिमांना वापरून घेऊ देणार नाही या दृष्टीकोनातून मुस्लिमांचे मतदान आणि मुस्लीम समाजातील उमेदवार राज्यकर्ते बनविण्यासाठी बाळापुरात बुधवारी रात्री चिंतन बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुस्लीम समाजाला वापरून घेणाऱ्या राजकीय पक्षांना धडा शिकविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
मुस्लीम समाजाला वापरून घेणाऱ्या राजकीय पक्षांना विरोध; समाजाच्या बैठकीतील निर्णय - muslim community meeting
मुस्लिमांचे मतदान आणि मुस्लीम समाजातील उमेदवार राज्यकर्ते बनविण्यासाठी बाळापुरात बुधवारी रात्री चिंतन बैठक घेण्यात आली. या बैठकीत मुस्लीम समाजाला वापरून घेणाऱ्या राजकीय पक्षांना धडा शिकविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रात मुस्लिमांनी आता काँग्रेस आणि इतर पक्षांना सोडून खरे राजकारणी यांना ओळखून एकत्रीतपणे मतदारसंघात मतदान करावे, ही आजची गरज आहे. मुस्लीम समाजातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजनैतिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी बाळापूर येथील फजल अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी चिंतन बैठक घेण्यात आली. मुस्लीम समाजातील एकतेमुळे औरंगाबाद येथे इम्तियाज जलील हे खासदार बनले आहे. असे असताना बाळापूर येथे काँग्रेसचा मुस्लीम उमेदवार असतानाही नेहमी पराभव होत आहे. काँग्रेसची ही खेळी ओळखून मुस्लीम समाज खऱ्या उमेदवारास पाठिंबा देईल, असा निर्णय या चिंतन बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीत फजल अंसारी, हाजी समी ठेकेदार, मुफ़्ती अशफाक एजाज खान, जम्मू सेठ, सय्यद मुजाहिद, डॉ फय्याज अकील पंजाबी, रहमान कुरेशी, सुलेमान भाई, बब्बू ठेकेदार, यूसुफ पठान, मो. मोलावी बरकत ,मौलवी इस्माइल, मुफ़्ती मुशीर, मौलवी शफीकुर्रहमान, हाफिज इलियास, हाफिज फारुख, हाफिज खान जमादार उपस्थित होते.