अकोला - सासुरवाडीत आलेल्या 42 वर्षीय युवकाचा डाबकी रोड परिसरात खून करण्यात आल्याची घटना आज सायंकाळी उघडकीस आली. हत्या करण्यात आलेला तरूण नागपूरचा असून संतोष पांडुरंग ठाकरे असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी डाबकी रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
अकोल्यात सासरी आलेल्या ४२ वर्षीय व्यक्तीची हत्या - डाबकी रोड
हत्या करण्यात आलेला तरूण नागपूरचा असून संतोष पांडुरंग ठाकरे असे त्याचे नाव आहे.
अकोल्यात एकाचा खून
सासरी राहण्यास आलेल्या संतोष यांचा मृतदेह गोकरणा पार्क मध्ये सापडला. यावेळी त्याच्या डोक्यावर व मानेवर हल्ला करण्यात आल्याचे घाव होते. दरम्यान, पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू आहे. पोलीस संतोषच्या सासरच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.