अकोला - गोदामातील धान्य चोरी करणाऱ्या 12 जणांच्या टोळीला अटक करण्याची घटना ताजी असताना शहर उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाने आज (दि. 15 जुलै) रेशनचा तांदूळ घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून 15 क्विंटल तांदूळ सह पाच लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सद्दाम खान शब्बीर खान, सैयद यासीन सैयद सैफूद्दीन अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
रेशनचा तांदूळ घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक; विशेष पथकाची कारवाई
शहर उपअधीक्षक यांच्या विशेष पथकाने रेशनचा तांदूळ घेऊन जाणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्याजवळून 15 क्विंटल तांदळासह पाच लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
स्थानिक गुन्हे शाखेने दोन दिवसाआधी 12 जणांना पकडले होते. त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. ही कारवाई ताजी असतानाच शहर उपअधीक्षक सचिन कदम यांच्या विशेष पथकाने मिळालेल्या माहितीनुसार प्रभात कीट्स ते अमनदीप ढाबा दरम्यान नाकाबंदी करून अकोला येथून सरकारी रेशनिंगचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याकरीता घेऊन जात असताना पकडला. सद्दाम खान शब्बीर खान, सैयद यासीन सैयद सैफूद्दीन यांच्या ताब्यातून अंदाजे 15 क्विंटल रेशनिंंग तांदूळसह इतर मुद्देमाल असा 5 लाख 30 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत जुने शहर पोलीस ठाण्यात कलम 3, 7 जीवनावश्यक कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.