महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

औरंगाबाद - शहरांपेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक - Aurangabad collector news

औरंगाबाद मधील ग्रामीण भागातही कोरोना वाढत आहे. मात्र, येथील लोक या आजाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. लोक साध्या तापासारखे आजार अंगावरच काढत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना वाढत असल्याचे बोलले जात आहे.

Aurangabad
Aurangabad

By

Published : Apr 23, 2021, 4:04 PM IST

औरंगाबाद - मागील काही महिन्यांमध्ये शहरी भागात थैमान घालणारा कोरोना ग्रामीण भागातही झपाट्याने वाढत असल्याची गंभीर अवस्था सर्वत्र पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात नागरिक आजाराकडे दुर्लक्ष करत असल्याने रुग्ण गंभीर होण्याची संख्या आणि मृत्यूची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच पसरत चालला आहे.

ग्रामीण भागातही कोरोनाचे थैमान -

औरंगाबाद जिल्ह्यात रोज जवळपास चौदाशे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. मागील काही दिवसांपूर्वी यात 800 ते 900 रुग्ण शहरातील असल्याचे अहवालात दिसून येत होते. तर चारशे ते पाचशे रुग्ण ग्रामीण भागातील असायचे. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये हे चित्र बदलले आहे. आता ग्रामीण भागात 50 टक्क्यांपैक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेेेत. तर मृतांचे आकडेही ग्रामीणमध्ये जास्त आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या ही चिंता वाढवणारी बाब म्हणावी लागेल.

यामुळे ग्रामीण भागात वाढला संसर्ग -

ग्रामीण भागात फिरताना लोक काळजी घेत नाहीत. अगदी लॉकडाऊन लागल्यानंतरही लोक बिनधास्त फिरत आहेत. मास्क घालणारे लोक फार कमी असल्याने प्रादुर्भाव वाढत चालला आहे. थोडा ताप आल्याने काय होते? सर्दी खोकला तर नित्यनियमाचाच. या पद्धतीने लोक वावरत आहेत. त्यामुळे लक्षणं नसलेले अनेक लोक कोरोना पसरवायला हातभार लावत असल्याचे दिसत आहे. औरंगाबाद ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यात 575 लोकांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे. गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात रुग्णांची संख्या 15 हजारांवर होती. गेल्या दोनच महिन्यात ती आता दुप्पट झाली आहे.

* सिल्लोड तालुक्यातील 80 गावात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, 924 रुग्ण आहेत.

* पैठण तालुक्यातील 135 गावात प्रादुर्भाव आहे, 3 हजार 221 रुग्ण आहेत.

* फुलंब्री तालुक्यात 82 गावात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे, 1 हजार 95 रुग्ण आहे.

* औरंगाबाद तालुक्यात 102 गावात प्रादुर्भाव आहे, 3 हजार 145 रुग्ण आहेत.

* सोयगावमधील 62 गावात प्रादुर्भाव आहेत, 259 रुग्ण आहेत.

* खुलताबाद तालुक्यात 62 गावात प्रादुर्भाव, 800 रुग्ण आहेत.

* वैजापूर तालुक्यात 123 गावात प्रादुर्भाव, 2500 वर रुग्ण आहेत.

* गंगापूर तालुक्यातील 116 गावात कोरोना प्रादुर्भाव, 4395 रुग्ण आहेत.

* कन्नड तालुक्यातील 176 गावात कोरोना प्रादुर्भाव, साडेतीन हजारांवर रुग्ण आहेत.

त्यामुळं आता ग्रामीण भागातही आरोग्य व्यवस्था वाढवण्यावर भर दिला जाईल, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले. ग्रामीण भागात रिकामे फिरणाऱ्या, नियम न पाळणाऱ्यांमुळे अनेक नियम पाळणारे गावकरीही त्रासले आहेत. सांगूनही उपयोग होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details