अकोला - जिल्ह्यातील काही तालुक्यांतील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने आज दुपारी जोरदार हजेरी लावली. यामुळे आंबा, कांदा, गहू, भुईमुगाचे नुकसान झाले आहे. त्याचबोरबर पातूर तालुक्यातील आलेगाव येथे बकऱ्या चरायला घेऊन गेलेल्या एका व्यक्तीचा वीज पडून मृत्यू झाला. तोताराम नवलकार, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा -अकोला : कडक संचारबंदीच्या आदेशानंतर खरेदीसाठी नागरिकांची गर्दी
हवामान विभागाने 7 ते 10 मे दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला होता. पातुर तालुक्यातील आलेगाव परिसरामध्ये दुपारी सोसाट्याचा वारा सुटला. सोबत जोरजोरात विजांचा कडकडाट व्हायला लागला. तसेच, पावसानेही हजेरी लावली. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे पाऊस पडला. या पावसामुळे काढलेला कांदा ओला झाल्याची शक्यता असून काढलेली भुईमूगही भिजला आहे.