अकोला - एकीकडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार आणि दुसरीकडे आपल्या गावातील विकासावर चर्चा सुरू असतानाच मूर्तिजापूर तालुक्यातील लोनसना येथील ग्रामस्थांनी मात्र निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. 'विकास नाही तर मतदान नाही' असे फलक लावून विकासाचीच खिल्ली उडवली आहे. त्यामुळे केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी विकासाचा मुद्दा घेऊन जाणारा सत्ताधाऱ्यांना लोनसना येथील ग्रामस्थांनी चांगली चपराक दिली आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघाचे आमदार हे भाजपचेच आहेत.
रस्ता नाही तर मतदान नाही; लोनसणा ग्रामस्थांचा बहिष्कार - BOYCOUT
लोकसभा निवडणुक प्रचाराने आता चांगलाच जोर पकडला आहे. अकोला जिल्ह्यातील अशी काही दुर्लक्षित गावे आहेत ज्या गावात जायला सुद्धा रस्ता नाही कोणत्याही भौतिक सुविधा नाहीत.
लोकसभा निवडणुक प्रचाराने आता चांगलाच जोर पकडला आहे. अकोला जिल्ह्यातील अशी काही दुर्लक्षित गावे आहेत ज्या गावात जायला सुद्धा रस्ता नाही कोणत्याही भौतिक सुविधा नाहीत. असेच एक गाव मूर्तिजापूर तालुक्यातील लोनसना. या गावातील नागरीकांनी रस्ता नसल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. गावकऱ्यांनी गावात येणाऱ्या रस्त्यावर फलक लावून त्यावर सरळ लोकप्रतिनिधीना प्रचारासाठी गावात येऊ नये, असे नमूद केले आहे.
लोनसना गावातील नागरिकांनी ७ जानेवारीला मूर्तिजापूर तहसीदार यांना निवेदन दिले होते. त्यावर तहसीदार यांनी मध्यस्ती करून बांधकाम विभाग लवकरच काम सुरू करणार असल्याचे सांगितल्यानंतर ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेतला होता. मात्र, अद्यापही रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्याने शेवटी गावकऱ्यांनी बहिष्कार सुरूच ठेवला आहे.
गेल्या १८ वर्षांपासून हे ग्रामस्थ या रस्त्यासाठी भांडत आहे. प्रशासन लोकप्रतिनिधीही या ग्रामस्थांना आश्वासने देऊन तोंडाला पाणी पोचले आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महिला रुग्णांना त्रास होत आहे. त्यामुळे 18 वर्ष रस्त्यासाठी जगूनही जर रस्ता मिळत नसेल तर मतदान करायचे कशाला असा प्रश्न ग्रामस्थ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे. रस्त्याविना विकास खुंटला असल्याची वस्तुस्थिती येथील ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे रस्ता नाही तर विकास नाही, असे म्हणत येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे.