महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोला: बारमध्ये चोरी करणाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या - akola latest news

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील एमपी बारमध्ये विदेशी दारूची चोरी करणाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेना आज मुसक्या आवळल्या.

स्थानिक गुन्हे शाखा
स्थानिक गुन्हे शाखा

By

Published : Jan 24, 2021, 6:41 PM IST

अकोला -राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील एमपी बारमध्ये विदेशी दारूची चोरी करणाऱ्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेना आज मुसक्या आवळल्या. या चोरट्यांकडून एक लाख 19 हजारांचा दारू व गुन्ह्यात वापरलेली कार किंमत चार लाख रुपये असा एकूण पाच लाख 19 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हसन उर्फ इम्मी छटु नीमसुरवाले आणि चांद तुकडया चौधरी यांना कारंजा येथून अटक केली आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील एमपी बिअर बारमधुन 21 जानेवारीला रात्री चोरट्यानी महागड्या ब्रँडची विदेशी दारूचे 22 बॉक्स किंमत एक लाख 70 हजार चोरून नेले होते.

पाच लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त-

चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरे मध्ये कैद झाला होता. बारमालक सीमांत तायडे यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारंजा येथून हसन उर्फ इम्मी छटु नीमसुरवाले आणि चांद तुकडया चौधरी यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. पोलिसांनी यातील 17 विदेशी दारूचे बॉक्स असा एकूण एक लाख 19 हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली गाडी किंमत चार लाख असा पाच लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

तीन दिवसांत लावला छडा-

एमपी बारमधून 21 जानेवारी रोजी चोरट्यानी चोरी केली. तर स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा तपास अवघ्या घटनेच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 24 जानेवारी रोजी लावला. त्यामुळे पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा-बाभळीच्या पाणीप्रश्नावर चर्चा करण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री 'नॉट रिचेबल'

ABOUT THE AUTHOR

...view details