अकोला - शहरात आज दुपारपासूनच अवकाळी पावसाची रिमझिम सुरू झाली आहे. गेल्या २ दिवसांपासून शहरामध्ये ढगाळ वातावरण होते. आज दुपारी साडेबारा वाजता अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
अकोल्यात अवकाळी पावसाची रिमझिम
सोमवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. त्यानंतर वातावरणात काहीसा दमटपणा निर्माण झाला होता. रात्रभर ढगाळ वातावरण होते. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
गेल्या २ दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच सोमवारी हवामान खात्यानेही पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार सोमवारी सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला. त्यानंतर वातावरणात काहीसा दमटपणा निर्माण झाला होता. रात्रभर ढगाळ वातावरण होते. आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तारांबळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी आश्रय घेतला. आज सायंकाळपर्यंत परत पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.