अकोला -तक्रारदाराच्या मालकाचे शेतीचे फेरफारला नोंद करून सातबारा देण्याकरिता 500 रुपयांची लाच मागणाऱ्या महिला तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी बाळापूर बसस्थानकातून रंगेहाथ अटक केली. या कारवाईने महसूल विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. जयश्री संतोष राणे, असे अटक केलेल्या महिला तलाठ्याचे नाव आहे.
हेही वाचा - मुस्लीम समाजाला वापरून घेणाऱ्या राजकीय पक्षांना विरोध; समाजाच्या बैठकीतील निर्णय
तक्रारदाराच्या मालकाचे शेतीचे फेरफारला नोंद करून सातबारा देण्याकरिता महिला तलाठी जयश्री राणे हिने तक्रारदारास 500 रुपयांची लाच मागितली होती. ही लाच देण्यास तक्रारदार तयार नसल्याने त्यांनी एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने 29 ऑगस्टला पडताळणी केली.