महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सांगोळा गावात होते रावणाची पूजा; राज्यातील एकमेव मंदिर - dassehra akola

वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे, अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. दशानन रावणात अनेक दुर्गुण होते. पण काही चांगले गुणही होते. याच गुणांच्या समुच्चयाने त्याची पूजा सांगोळ्यात करण्यात येते. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव नजीक सांगोळा हे गाव आहे.

सांगोळा गावात होते रावणाची पूजा

By

Published : Oct 8, 2019, 8:01 PM IST

अकोला- अवघ्या भारतवर्षात मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाची पूजा होणे आणि त्यांचा शत्रू म्हणून खलनायकत्व मिळालेल्या रावणाची हेटाळणी होणे, यात आश्चर्य ते काय? परंतु, अकोला जिल्ह्यातील सांगोळा हे गाव त्याला अपवाद आहे. रावणाच्या सद्गुणांमुळे येथे रावणाची दर दसऱ्याच्या दिवशी पूजा केली जाते. तब्बल 300 वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे.

सांगोळा गावात होते रावणाची पूजा

हेही वाचा-ओबीसी राजकारणाचा नवा केंद्रबिंदू... काय आहे भगवान भक्ती गड?

वाईट ते सोडावे आणि चांगले ते घ्यावे, अशी शिकवण आपल्या संस्कृतीने दिली आहे. दशानन रावणात अनेक दुर्गुण होते. पण काही चांगले गुणही होते. याच गुणांच्या समुच्चयाने त्याची पूजा सांगोळ्यात करण्यात येते. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव नजीक सांगोळा हे गाव आहे. गावाच्या पूर्वेस एका ओट्यावर रावणाची पुरातन मूर्ती आहे. हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य तसेच श्रद्धास्थानही आहे. रावण कपटी, अहंकारी होता. अमर्याद भोगलालसा आणि महत्त्वाकांक्षा या अवगुणांमुळे त्यात असुरी वृत्ती होती. रावणातील हे दुर्गूण बाजूला सारले तर त्याच्यातील गुणांचे दर्शन होते. तपस्वी, बुद्धिमान, शक्तीशाली, वेदाभ्यासी या गुणांमुळेच सांगोळ्यात रावणाची पूजा केली जाते. हे रावणाचे मंदिर जिल्हातले नव्हे तर राज्यातील एकमेव असल्याचे बोलल्या जाते.

हेही वाचा-मला सल्ला देणाऱ्या तावडेंसोबत नियतीने 'विनोद' केला - अशोक चव्हाण

महापंडित रावणाची लंका नगरी अकोल्यापासून हजारो किलोमीटर दूर आहे. पण अकोला जिल्ह्यातील सांगोळा या गावात महापंडित दशानन रावणाची नित्यनियमान पूजा केली जाते. गेल्या 300 वर्षांपूर्वी या भागात वास्तव्यास असणाऱ्या एका ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपश्चर्याकेली होती. त्यांच्याच प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रमही होतात. ऋषी ब्रह्मलीन झाल्यानंतर एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती बनविण्याचे काम सोपविण्यात आले. पण, त्यांच्या हातून घडली ती दशानन रावणाची ही मूर्ती. दहा तोंडे, काचा बसवलेले 20 डोळे, सर्व आयुध असलेले 20 हात, अशी विराट मूर्ती त्यांनी घडवली. दहा फाटे असलेले सिंदीचे झाड आणि अवचित घडलेली ही लंकेश्वराची मूर्ती, हा योगायोग श्रद्धाळूग्रामस्थांनी हेरला आणि गावात लंकेश्वर स्थिरावले. गावात रावणाचे मंदिर बांधले जावे, अशी आता ग्रामस्थांची इच्छा आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details