महाराष्ट्र

maharashtra

अकोल्यातील धारगड यात्रेत जय भोलेच्या घोषात भाविकांची गर्दी

By

Published : Aug 20, 2019, 12:56 PM IST

मेळघाटातील पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील धारगड येथे तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. 'जय भोले'चा गजर करत भाविक दगडाच्या भुयारातील महादेवाच्या मूर्तीला नतमस्तक होवून आपली मनोकामना मागत होते. वर्षभरात फक्त श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी येथील मंदीर उघडण्यात येते.

अकोल्यातील धारगड यात्रेत जय भोलेच्या घोषात भाविकांची गर्दी

अकोला -मेळघाटातील पायथ्याशी असलेल्या अकोट तालुक्यातील धारगड येथे तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. 'जय भोले'चा गजर करत भाविक दगडाच्या भुयारातील महादेवाच्या मूर्तीला नतमस्तक होवून आपली मनोकामना मागत होते. अकोट वनविभाग, अकोट पोलिस अधिकारी व कर्मचारी यासोबतच धारगड सेवा समिती भाविकांना सहकार्य करत आहेत.

अकोल्यातील धारगड यात्रेत जय भोलेच्या घोषात भाविकांची गर्दी

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी अकोट तालुक्यातील धारगड येथील डोंगराळ भागात एका मोठ्या दगडात भुयार कोरलेले आहे. यात महादेवाची मूर्ती आहे. दर्शनासाठी भाविक सात डोंगर चढून महादेवाचे दर्शन घेतात. गेल्या काही वर्षापासून येथे जाण्यासाठी वनविभागाकडून प्रस्ताव तयार करण्यात आल्याने या मार्गाने आता वाहने जात आहेत. त्यामुळे ही बाब भाविकांच्या फायद्याची ठरली आहे. भाविकांची व्यवस्था करण्यासाठी धारगड सेवा समितीचे पदाधिकारी व सदस्य यासोबतच अकोट वनविभाग, अकोट पोलीस विभाग हे ८ दिवसांपासून व्यवस्था करतात. जागृत देवस्थान आणि हजारो वर्षे जुने असलेले हे देवस्थान भाविकांसाठी सध्याचे महत्त्वाचे ठिकाण ठरले आहे.

येथील मंदीर पुरातनकाळाती असून काही भाविक ३५ किलोमीटर पायी चालत येतात. या मंदिरात टेकडीवरून सतत पाणी पडत असते. हे पाणी नेमके कुठून पडते, याचा अजूनपर्यंत शोध लागलेला नाही. त्यामुळेच या ठिकाणाला धारगड असे नाव पडले असून या महादेवाला धारगडचा महादेव असेही म्हणतात. वर्षभरात फक्त श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी हे उघडण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details