अकोला- ग्राम रौंदाळा तसेच तेल्हारा शहारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये 19 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत 69 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जुगार अड्ड्यावर छापा : 19 जणांवर गुन्हा दाखल, 69 हजारांचा मुद्देमाल हस्तगत - akola crime news
ग्राम रौंदाळा तसेच तेल्हारा शहारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये 19 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
तेल्हारा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना गस्त घालताना गुप्त माहिती मिळाली. ग्राम रौंदळा तसेच तेल्हारा येथील मानकर चौक याठिकाणी वरली मटक्याचा जुगार सुरू असल्याचे यामधून कळले. संबंधित माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून बापूराव पांडूरंग अबगड, दिपक मुकीदा भोजन, रमेश पुरुषोत्तम सपकाळ, उमेश रमेश दिवनाले, जयंता गणोजी तायडे, वसंता रायभान आठवले तसेच नंदपाल गणेश वानखडे, साहेबराव बापूराव आठवले यांना ताब्यात घेतले आहे. यांसोबत अन्य चौघांवर कारवाई केली.
तेल्हारातील मानकर चौकातून अमोल जनार्दन डांगे, अमोल बाबूराव जवंजाळ, शंकर ओकार पोटे, विकास विश्वनाथ कुईटे, सुनिल रघुनाथ खापरकर यांना ताब्यात घेण्यात आले. संबंधित कारवाईत पथकाने 69 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या मटका व्यवसायाचे मालक गजानन बाप्पुराव सरोदे तसेच गजानन पाटील यांविरोधात तेल्हारा पोलीस ठाण्यात कलम 12 महाराष्ट्र जुगार कायदा तसेच कलम 109 (भा.दं.सं) अन्वये गुन्हा नोंदण्यात आला आहे.