महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात सव्वा दोन कोटींची रासायनिक खते व कीटकनाशके सीलबंद, फसवणुकीचा गुन्हा दाखल

खतांच्या बॅगवर उत्पादकाचे नाव नसल्याने व  परावान्यामध्ये समाविष्ट नसलेले सहा घटक उत्पादनात आढळून आल्याने कंपनीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला

By

Published : Apr 5, 2019, 1:12 PM IST

अकोला -कृषी विभागाच्या गुणनियंत्रण पथकाने एमआयडीसी २ मधील गोदामात कारवाई करीत दोन कोटी २० लाख रुपये किमतीचा रासायनिक खते व कीटकनाशकांचा साठा सीलबंद केला आहे. खतांच्या बॅगवर उत्पादकाचे नाव नसल्याने व परावान्यामध्ये समाविष्ट नसलेले सहा घटक उत्पादनात आढळून आल्याने कंपनीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषी आयुक्तालयातील गुणनियंत्रण संचालक यांच्या सूचनेनुसार जिल्हास्तरीय पथकाने हा छापा टाकला. पथकामध्ये जिल्हा परिषद माहिती अधिकारी वजनदार गुणनियंत्रण निरीक्षक नितीन लोखंडे यांचा समावेश होता. पथकाने १६ मार्च रोजी एमआयडीसी फेजमधील गोदामात छापा टाकला होता. मात्र, त्यावेळी साठ्याची तपासणी केली असताना त्यासाठी लागणारी कागदपत्रे सादर करण्याची मुदत देण्यात आली. त्यानंतर पुन्हा २९ मार्चला कारवाई करून साठ्याची पडताळणी करण्यात आली.

वास्तविक परवान्यानुसार उपलब्ध विद्राव्य खते व सूक्ष्म मूलद्रव्यांचे उत्पादक हे इशिता इंटरनॅशनल नागपूर हे आहेत. मात्र, खतांच्या बॅगवर उत्पादकांचा उल्लेख केलेला नाही. खतांच्या बॅगवर 'पॅकेज ऍण्ड मार्केटिंग बाय मे. सेवियो बायोऑरगॅनिक अँड फर्टिलायझर प्रा. ली. असे छापलेले दिसून आले. त्यामुळे खत नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याने साठा सील करून विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पथकाने १ लाख १४ हजार लिटर किटनाशक साठा सीलबंद केला आहे. त्याची किंमत १ कोटी ६३ लाख आहे. तर विद्राव्य खतांचा साठा ८१.४६ मेट्रिकटन असून त्याची किंमत ५५ लाख रुपये आहे. याविरोधात पथकाने दिलेल्या फिर्यादनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details