अकोला: पातूर पोलीस ठाण्याच्या Patur Police Station हद्दीतील शेकापूर (राम नगर) मध्ये एका दारुड्या पतीने आपल्या पत्नीची कुऱ्हाडीचे घाव घालून Akola Crime निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोपीचंद राजाराम चव्हाण असे आरोपीचे नाव आहे. तर संगीता गोपीचंद चव्हाण असे हत्या झालेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
आरोपी गोपीचंद आणि संगीताचा विवाह 8 वर्षांपूर्वी झाला होता. काही दिवस संसार सुरळीतपणे सुरू असतांना गोपीचंदला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे दोघांच्यामध्ये वाद होत असतं. नेहमी दारू पिऊन गोपीचंद हा संगीताला मारहाण करत, तिच्यावर संशय घेत असल्याने तिने पातूर पोलीस ठाण्यात गोपीचंद विरोधात 3 वेळा तक्रारीसुद्धा दिली होती. परंतु पातूर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही. शेवटी संगीताचे गावातच माहेर असल्याने ती आपल्या अर्जुन आणि अंशुमन या 2 मुलांसह माहेरी राहत होती.