अकोला- गेल्या तीन दिवसांपासून अकोल्यातील तापमानाने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. आज अकोल्यातील तापमान ०.३ अंशाने कमी म्हणजेच ४६.९ अंश तापमान होते. तरीही उष्णतेची दाहकता आजही कायम होती. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
अकोल्यात उष्णतेची दाहकता कायम; तापमान ४६.९ अंशावर - पारा
बाहेर निघालेल्या अकोलेकर सावली, थंड पाणी, शीतपेय, उसाचा रस, शरबत, ज्यूस यांचा आसरा घेताना पाहायला मिळत आहे.
अकोल्यात एप्रिल महिन्यात ४७.२ अंशावर पोहोचलेल्या तापमानाने रेकॉर्ड ब्रेक केला आहे. त्यानंतरही उष्णतेची दाहकता कायम आहे. दिवसभर व रात्रीही गरम हवा लागत असल्याने अकोलेकर घराबाहेर पडत नाही. उष्णतेची लाट मंगळवारपर्यंत (३० एप्रिल) राहणार असली तरी ती ओसरण्यासाठी वेळ लागणार असल्याचे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले आहे. उष्ण तापमानामुळे अकोलेकर भरदुपारी घरातून बाहेर पडत नसल्याने शहरातील गांधी रोड या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे. तसेच रस्तेही उन्हामुळे ओसाड पडले आहेत. तर बाहेर निघालेल्या अकोलेकर सावली, थंड पाणी, शीतपेय, उसाचा रस, शरबत, ज्यूस यांचा आसरा घेताना पाहायला मिळत आहे.