महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

काँग्रेसच्या सुप्त लाटेत अकोल्यात पंजाच येणार; हिदायत पटेल - POSITIVE

अकोल्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी विजयी होईल, असा आशावाद आघाडीचे उमेदवार हिदायत पटेल यांनी आज व्यक्त केला.

हिदायत पटेल

By

Published : May 21, 2019, 8:27 AM IST

अकोला - कोणतही वादळ येण्यापुर्वी शांतताच असते. देशातही तीच परिस्थीती आहे. सगळीकडे काँग्रेसची सुप्त लाट आहे. अकोल्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी विजयी होईल, असा आशावाद आघाडीचे उमेदवार हिदायत पटेल यांनी आज व्यक्त केला.

काँग्रेसच्या सुप्त लाटेत अकोल्यात पंजाच येणार; हिदायत पटेल
केंद्र व राज्यातील भाजप सरकारनं जनतेची दिशाभूल केली आहे. दिलेलं कोणतही आश्वासन पूर्ण केले नाही. या निवडणुकीत सामान्य जनता शांत होती. अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्यावरील लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या नाराजीचा फायदा काँग्रेसला होईल. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुकीला सामोरे जाताना आखलेल्या रणनीतीचा फायदा आघाडीला होणार आहे. त्यामुळेच अकोल्यातही त्याचे पडसाद उमटतील. येथून काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील, असा आशावाद मतमोजणीच्या आधी काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details