अकोला - जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळपासून अतिमुसळधार पाऊस झाल्याने शहरातील मोर्णा नदीला मोठा पूर आला आहे. यामध्ये जवळपास पन्नास ते साठ घर पुर्णतः पाण्याखाली आली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू आहे. काही गावात पाणी साचले असल्याने तिथे पूर सदृश्य परिस्थिती आहे. रात्रभरात 202.9 मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याने घेतली आहे. दरम्यान पालिका प्रशासनाने रेस्क्यू पथकाच्या मदतीने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.
जिल्ह्यातील रेस्क्यू टीमला सतर्क राहण्याचे आदेश -
मोर्णा नदीच्या पुरामुळे जिल्ह्यातील नागरिकांची एकच धावपळ झाली. तर या नदीचे पाणी हरिहर पेठ, अंबिकानगर, खोलेश्वर आणि खदान, शास्त्रीनगर, खडकी, चांदुर, लोणी या गावांना पुराचा वेढा बसला आहे. यामध्ये काही नागरिक घराबाहेर निघण्यात यशस्वी राहिले. तर काही नागरिक अजूनही फसलेले असल्याची माहिती प्रशासने दिली आहे. तर प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील रेस्क्यू टीम यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
रेस्क्यू पथकानी नागरिकांना हलविले सुरक्षित ठिकाणी जीवनावश्यक साहित्य गेले वाहून -
मोरणा नदी आपल्या धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त चार ते पाच फुटाने वाहत आहे. दरम्यान नदीकाठच्या नागरिकांच्या घरांमधील गॅस सिलेंडर, भांडी, कपडे व धान्य, काही वस्तू वाहून गेले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या अनेक पथके नागरिकांना रेस्क्यू करीत आहे. लोणी गावांला चार ही बाजूने पुराचा वेढा दिला. ती अडकलेली आहेत. ट्रॅक्टर पलटी झाले आहे. तर काही जनावरे वाहून सुद्धा गेल्याची माहिती लोणीचे पोलीस पाटील निळू पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील वाहतूक ठप्प -
याठिकाणी पोलिसांच्या संपूर्ण वेगवेगळ्या टीम्स लोकांना रेस्क्यू करण्याचे काम सुरू आहे. आणि पोलिसांनी वायरलेसच्या माध्यमातून शहरात आणि जिल्ह्यात आणीबाणीची घोषणा केली आहे. लोकांना तसेच नदीकाठच्या लोकांना रेस्क्यू करत त्यांना शाळा मंदिर व देवालय या ठिकाणी त्यांची सध्याची राहण्याची व्यवस्था केली आहे. तसेच अकोल्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर एक ते दीड फूट पाणी साचलेले आहे. या रस्त्यावरील वाहतूक ही सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहे. तसेच वाहन चालकही वाहने हळूहळू चालवीत आहे.
भाजपचे आमदार, नगरसेवक रात्रीपासून नागरिकांच्या मदतीला
शहरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी गेले आहे. सखल भागात पाणी साचले असल्याने या परिसरातील नागरिकांना पुराचा सामना करावा लागला आहे. नदीकाठच्या रहिवाशांना धीर देण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा, आमदार तथा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, शहराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्यासह आदी भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी हे नागरिकांपर्यंत पोहोचले. त्यांना धीर देत त्यांची हवी तशी मदत केली. अनेकांना सुरक्षित ठिकाणी नेले. आमदार शर्मा तर कंबरे इतक्या पाण्यात जाऊन अडकलेल्या नागरिकांशी बोलले. त्यांना मदतीचे आश्वासन दिले होते.