महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खत आणि बियाणांचा काळा बाजार थांबवा - पालकमंत्री डॉ. पाटील - seeds

यावर्षी बियाणे, खते व किटकनाशके याबाबत कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येऊ नये. काळाबाजार रोखण्यासाठी 24 निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 7 भरारी पथक तयार करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन कार्यक्रमा अंतर्गत, गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील जिनींग व प्रेसींग मिलची बैठक घेऊन त्यांना वेस्ट मटेरीयल नस्ट करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत

खत आणि बियाणांचा काळा बाजार थांबवा - पालकमंत्री डॉ. पाटील

By

Published : May 17, 2019, 9:42 PM IST

अकोला - खतांचा व बियाण्यांचा होणार काळा बाजार रोखण्यासाठी कृषी विभागासह इतर संबंधीत यंत्रणेनी दक्ष रहा. कोणत्याही शेतकऱ्यांला येत्या खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके यांची कमतरता पडणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्यावी, असे आदेश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज दिले. पालकमंत्री तथा गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील यांचे अध्यक्षतेखाली खरीप पुर्व तयारी आढावा बैठक नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे ते बोलत होते.

खत आणि बियाणांचा काळा बाजार थांबवा - पालकमंत्री डॉ. पाटील

यावेळी अकोला जिल्ह्याचे पालक सचिव सौरभ विजय, आमदार गोपीकिसन बाजोरीया, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची प्रमुख उपस्थिती होती. सामाजिक वनीकरण विभागातर्फे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतकऱ्यांच्या शेताच्या बांध्यावर वृक्ष लागवड या योजनेसाठी शेतकऱ्यांना आवळा, बोर, सिताफळ यासारखे वृक्ष पुरविण्यात यावेत यासाठी वन विभाग व कृषी विभागाने संयुक्त रित्या प्रयत्न करुन ही योजना यशस्वी करावी अश्या सूचना पालकमंत्र्यानी दिल्या.

जिल्ह्यात खरीप हंगामाचे 4.81 लक्ष हेक्टर सरासरी क्षेत्र असून मागच्या वर्षी 4.20 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती. मागच्या वर्षी सरासरी 101 टक्के पर्जन्याची नोंद झाली. मात्र, खरीप हंगाम १० ते २१ दिवसांचा खंड पडल्यामुळे आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस कमी झाल्यामुळे हंगामातील उत्पन्नात घट झाली होती. यावर्षी भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सरासरी 96 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. परंतु जुन व जुलै महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस होणार आहे तर ऑगष्ट व सप्टेंबर महिन्यात सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज आहे.

यावर्षी कपाशीचा पेरा मागील वर्षाच्या तुलनेत वाढणार आहे. 1.65 लक्ष हेक्टरवर कपाशीची लागवड खरीप हंगामात होणार आहे. तर सोयाबीनची लागवड जवळपास 1.65 लक्ष हेक्टरवर होणार असल्याची माहिती जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी अरुण वाघमारे यांनी दिली.

यावर्षी 64 हजार 261 क्वीटल बियाणाची आवश्यकता आहे. यापैकी 60 हजार 572 क्विटल बियाणे महाबिज मार्फत पुरविण्यात येणार आहे. बिटी बियाण्याची 7 लक्ष 20 हजार पाकीटाची मागणी असून यामध्ये अजित-115, मलीका-207 व राशी-659 या जातीच्या बियाण्याचा समावेश आहे. खरीप हंगामासाठी एकुण 84 हजार 990 मेट्रीक टन खताची आवश्यकता असून त्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात खताची व बियाण्याची कोणतीही कमी असणार नाही अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावर्षी बियाणे, खते व किटकनाशके याबाबत कोणत्याही शेतकऱ्याची तक्रार येऊ नये. काळाबाजार रोखण्यासाठी 24 निरिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 7 भरारी पथक तयार करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली. गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन कार्यक्रमा अंतर्गत, गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यातील जिनींग व प्रेसींग मिलची बैठक घेऊन त्यांना वेस्ट मटेरीयल नस्ट करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. कापुस उत्पादक शेतकऱ्यांना कामगंध सापळे लावण्याबाबत जनजागृती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details