महाराष्ट्र

maharashtra

मंत्री बच्चू कडू झाले "पठाण", डोक्यावर मुस्लिम टोपी आणि शेरवानीतील लुक झाला व्हायरल

By

Published : Jun 21, 2021, 9:59 PM IST

Updated : Jun 23, 2021, 7:02 PM IST

वेशांतर करून पालकमंत्र्यांनी अकोला शहर व पातूर येथील विविध शासकीय कार्यालयांची झाडाझडती घेतली. स्वस्त धान्य दुकानांची पाहणी केली तर बँकेतही पाहणी केली.

bacchबच्चू कडू यांनी केले स्टिंग ऑपरेशनu Kadu sting operation
बच्चू कडू यांनी केले स्टिंग ऑपरेशन

अकोला -प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू हे अनोख्या आंदोलनांसाठी ओळखले जातात. राज्यमंत्रीपद व अकोल्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यानंतरही त्यांच्या कार्यशैलीत कोणताही बदल झाला नसल्याचा प्रत्यय सोमवारी अकोला जिल्ह्यातील नागरिकांना आला. वेशांतर करून पालकमंत्र्यांनी अकोला शहर व पातूर येथील विविध शासकीय कार्यालयांची झाडाझडती घेतली. स्वस्त धान्य दुकानांची पाहणी केली तर बँकेतही पाहणी केली. विशेष म्हणजे, त्यांनी गुटखा विक्रेत्यांवर धाड टाकून त्यांचा माल जप्त करीत पोलिसांना गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. या स्टिंग ऑपरेशनमध्ये गुटखा माफिया आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यासोबतच झोपेचे सोंग घेवून राहणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे पितळही उघडे पडले आहे.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले स्टिंग ऑपरेशन

अकोला जिल्ह्यातील कारभाराचा जवळून अनुभव घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी सोमवारी कोणताही शासकीय दौरा जाहीर न करता जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेटी दिल्यात. शासकीय यंत्रणा, बँका कशा काम करतात, नागरिकांना त्याचा कोणता त्रास होते, हे जवळून अनुभवण्याच्या उद्देशाने त्यांनी वेशांतर करीत युसुफ खाँ पठाण हे बनावट नाव धारण करून कोणताही ताफा सोबत न घेता मोजक्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अकोला व पातूर या ठिकाणी भेटी दिल्यात.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले स्टिंग ऑपरेशन

पालकमंत्र्यांनी महानगरपालिकेपासून सुरुवात केली. त्यांनी आयुक्त नीमा अरोरा यांच्या कार्यालयात भेट दिली. आयुक्त नसल्याने त्यांनी स्वीय सहाय्यकासोबत चर्चा केली व ते निघून गेले. ते निघून गेल्यानंतर पालकमंत्री कार्यालयात येऊन गेल्याची माहिती मिळाल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. महानगरपालिकेत झाडाझडी घेतल्यानंतर अकोल्यातील एका दुकानावरून गुटखा विकत घेतला. त्यानंतर त्यांचा मोर्चा पातूर येथे पोहोचला. तेथे त्यांनी विदर्भ कोंकण बँकेत जाऊन कर्जाबाबत अर्ज भरून घेण्यास सांगितले. तातडीने अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांना पैसेही देवू केले. मात्र, बँकेच्या व्यवस्थापकांनी प्रामाणीकपणे रितसर अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर पातूर तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात त्यांचा ताफा पोहोचला. तेथे त्यांनी तातडीने राशन कार्ड बनविण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा केली. अधिकाऱ्यांनी रितसर अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर दोन स्वस्त धान्य दुकानांची त्यांनी पाहणी केली. मात्र, तेथेही त्यांना प्रामाणीपणाचा प्रत्यय आला. ऑनलाइन वितरण असल्याने कुणालाही धान्य देता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. कृषी सेवा केंद्रावर जाऊन बियाणे वितरणाची व्यवस्था त्यांनी बघितली. त्यानंतर त्यांनी पातूर येथील एका किराणा दुकानात धाड टाकून तेथे गुटखा जप्त केला. पोलिसांना बोलावून रितसर कारवाई करीत विक्रेत्यावर स्वतः बसून गुन्हा दाखल करून घेतला.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले स्टिंग ऑपरेशन

पोलीस, अन्न औषध प्रशासनावर हप्तेखोरीचा आरोप -

पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे करणारे, गुटखा विक्रेता यांची झाडाझडती घेतली. त्यात विक्रेत्यांनी अन्न औषध प्रशासन व पोलिसांना हप्ते पुरविले जात असल्याची माहिती पालकमंत्र्यांना दिली. दोन्ही विभागांवर गुटखा विक्रीला प्रतिबंध करण्याची जबाबदारी असताना त्यांच्याकडून हप्ते खाण्याचे काम सुरू असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोपही पालकमंत्र्यांनी केला.

पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले स्टिंग ऑपरेशन
या स्टिंग ऑपरेशन नंतर पालकमंत्री बच्चू कडू हे अकोला शासकीय विश्रामगृह येथे आले. त्यांनी दिवसभरातील घटनाक्रम पत्रकारांना सांगितला. तसेच त्यांनी यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले होते.
Last Updated : Jun 23, 2021, 7:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details