अकोला -एका कापड व्यावसायिकाकडून मागील वर्षीच्या करात कपात करून देण्यासाठी 15 हजार रुपयांची घेणाऱ्या महिला राज्य कर अधिकाऱ्यास गुरूवारी दुपारी अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. या महिला अधिकारीला रोख रक्कम घेताना रंगेहात अटक केली आहे. शुभांगी रामचंद्र डगवार असे अटक केलेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे.
जीएसटी महिला अधिकाऱ्यास 15 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक - accepting bribe
एका महिला जीएसटी अधिकाऱ्यास 15 हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली.
हेही वाचा..बंदोबस्तातील पोलिसांना 'ही' सुविधा पुरवली पाहिजे, शरद पवारांचे गृहमंत्र्यांना पत्र
तक्रारदार व्यक्तीचा कापडाचा व्यवसाय आहे. त्यांचे वर्ष 2011, 2012 चा कर कमी करून देण्यासाठी या महिला अधिकाऱ्याने 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही मागणी तक्रारदार यांना मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे याबाबत तक्रार दिली. या तक्रारीवरून एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 21 जानेवारी, 4 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारी रोजी पडताळणी केली. त्यानंतर जीएसटी कार्यालयात सापळा रचला आणि शुभांगी डगवार यांना रक्कम स्वीकारताना रंगेहाथ अटक केली.