महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यात डाकुंचे सरकार -किरीट सोमैया - MP Sanjay Raut

भाजपची जनाशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या कोविड पर्वाची सुरुवात आहे. अस शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणतात. मग, कोविडचे दुसरे जे पर्व झाले, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अशिर्वादामुळे झाले का? असा उलट सवाल भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. ते अकोला येथे पत्रकारांशी बोलत होते.

भाजप नेते किरीट सोमैया
भाजप नेते किरीट सोमैया

By

Published : Aug 20, 2021, 6:01 PM IST

अकोला - शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणतात भाजपची जनाशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या कोविड पर्वाची सुरुवात आहे. मग कोविडचे दुसरे जे पर्व झाले ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अशिर्वादामुळे झाले का? भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. दरम्यान, राज्यात डाकुंचे सरकार आहे. आपण लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चार शिवसैनिकांचे घोटाळे जनतेसमोर आणणार आहोत. तसेच, मिलिंद नार्वेकर यांचा बंगला आठवड्यात जमीनदोस्त करणार आहोत, असही सोमैया म्हणाले आहेत. ते वाशिम येथे रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी जात असताना, अकोला येथे माध्यमांशी बोलत होते.

भाजप नेते किरीट सोमैया पत्रकारांशी बोलताना

'सुमारे 50 कोटींचे घोटाळे'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चार महान शिवसैनिकांचे चार महान घोटाळे आपण जनतेसमोर आणले आहेत. वाशिम खासदार भावना गवळी यांनी फक्त शंभर कोटींचे घोटाळे केले एवढेच मर्यादित नाही, जवळपास 15 कोटींचे आर्थिक रोख व्यवहार भावना गवळी यांनी केला आहे. असा आरोपही त्यांनी केला आहे. परवा मी आमदार यामिनी जाधव, मुंबई महापालिका स्टँडिंग कमिटी चेअरमन यशवंत जाधव त्यांचा घोटाळा उघडकीस आणला. हे सुमारे 50 कोटींचे घोटाळे आहेत. चार कोटोंचे मनी लँडरिंगचे घोटाळे तिथे झाले आहेत. दरम्यान, त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. तसेच, यशवंत जाधव, यामिनी जाधव यांच्यावर ईडीची कारवाई सुरू आहे. अशी माहितीही सोमैया यांनी दिली आहे.

'...त्यांची अवस्था अनिल देशमुख यांच्यासारखी होणार'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर असे वाटले की, 'अभि तो मै राजा बन गया' मिलिंद नार्वेकर यांनी दापोलीच्या समुद्र किनाऱ्यावर बंगलो बांधला आहे. आठवड्याच्या आत त्यांचा बंगला मी जमीनदोस्त करणार आहे असा दावा सोमैया यांनी यावेळी केला आहे. तसेच, मुख्यमंत्री यांचे चौथे शूर शिपाई अनिल परब यांच्या विरोधाततही न्यायालयीन कारवाई सुरू झालेली आहे. त्यांची अवस्थाही लवकरच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासारखी होणार आहे असही सोमैया म्हणाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details