अकोला- अर्थसंकल्पामध्ये सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढणार आहे. यामुळे सोन्याच्या भावात वाढ होणार आहे. त्यामुळे वाढलेले सोने खरेदी करण्यासाठी सामान्य ग्राहक काही धजावणार नसल्याची भीती सराफा व्यावसायिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.
कस्टम ड्युटी वाढीमुळे ग्राहकांच्या संख्येत होणार घट, सराफा व्यावसायिकांना भीती - अर्थसंकल्प
सोन्यावरील कस्टम ड्युटी वाढणार आहे. यामुळे सोन्याच्या भावात वाढ होणार आहे. त्यामुळे सोने खरेदी करण्यासाठी सामान्य ग्राहक काही धजावणार नसल्याची भीती सराफा व्यावसायिकांकडून व्यक्त केल्या जात आहे.
यासंदर्भात साखरकर ज्वेलर्सचे संचालक सचिन साखरकर यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी सराफा व्यावसायिकांवर भविष्यात येणारी भीती व्यक्त केली. तर गेल्या दोन ते तीन वर्षांपासून चांदीचे भाव स्थिर होते. त्यामुळे ग्राहक चांदीकडे वळू शकतील, असेही साखरकर यावेळी म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावर कस्टम ड्युटी वाढणार असल्याचे अर्थमंत्री यांनी अर्थसंकल्पात म्हटले आहे. या कस्टम ड्युटीमुळे सोन्यावरील भाव या किमतीत वाढणार आहे. आधीच सोने 3 हजार 430 रुपयांवर पोहोचलेले आहे. या किमतीत आणखी हजार रुपयांपर्यंत भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधीच जीएसटीमुळे व्यवसायात आलेली अवकळा आणखी कायम राहणार असल्याचे सराफा व्यवसायिक सचिन साखरकर यांनी सांगितले. आधीच भाववाढीमुळे ग्राहकांची संख्या 70 टक्के कमी झाली आहे. आता सामान्य ग्राहक फिरकत नाही. यामुळे आता श्रीमंत ग्राहकच सोने खरेदी करेल आणि त्यालाही मर्यादा येईल, असेही साखरकर म्हणाले.