अकोला -जठारपेठ चौकात कुख्यात गुंड देशी कट्टा बाळगून परिसरात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या माहिती रामदास पेठ पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुंडाला गुरूवारी दुपारी अटक केली. त्याच्यकडून एक देशी कट्टा, चार जिवंत काडतुस, एक मॅगझीन, एक गोळीची केस असा ऐवज जप्त करण्यात आला.
देशी कट्टा व जिवंत काडतुससह कुख्यात गुंडास अटक, रामदास पेठ पोलिसांची कारवाई - gangster was arrested in Akola
देशी कट्टा व जिवंत काडतुससह कुख्यात गुंडास अटक करण्यात आली. ही कारवाई रामदास पेठ पोलिसांनी केली.
कुख्यात गुंड जठारपेठ चौकामध्ये देशी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती रामदास पेठ पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांना मिळाली. त्यांनी एक पथक पाठवून कुख्यात गुंड अजु ठाकुरला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ देशी कट्टा, चार जिवंत काढतूस, एक रिकामे गोळीचे केस व मॅक्झिन असा शस्त्रांचा साठा मिळून आला. रामदासपेठ पोलिसांनी हा साठा जप्त करत त्याला अटक केली. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
ठाकूर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी, मारहाण, जबर मारहाण, जीवे मारण्याचे गुन्हे यासह इतर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक गजानन गुल्हाने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.