अकोला- सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यात मृत नकोशी आढळल्याने खळबळ उडाली. ही घटना अकोट तालुक्यातील केळीवेळी येथे घडली. याप्रकरणी दहीहंडा पोलीस ठाण्यात नकोशीला टाकूण देणाऱ्या मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केळीवेळीत नाल्यात आढळली 'नकोशी'; परिसरात खळबळ - पोलीस
अकोट तालुक्यातील केळीवेळी येथील नाल्यात मृत नकोशी आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी दहीहंडा पोलीस ठाण्याचे पोलीस नकोशीला नाल्यात फेकणाऱ्या निर्दयी मातेचा शेध घेत आहेत.
केळीवेळी येथे सांडपाणी वाहून नेणाऱ्या नालीत मृत नकोशी असल्याचे येथील नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे या घटनेची माहिती ग्रामस्थांनी दहीहंडा पोलिसांना दिली. माहिती मिळताच दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठले. त्यांनंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृत नकोशीला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
ही नकोशी सहा महिन्याची असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. नकोशी या नाल्यात कोणी टाकली याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलीस या नकोशीला नाल्यात फेकणाऱ्या निर्दयी मातेचा शोध घेत असल्याची माहिती ठाणेदार कात्रे यांनी यावेळी दिली.